Skip to main content

( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

लेखक नीलमोहर यांनी रविवार, 24/07/2016 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... राया तो माजा भ्येटंल काय, न भ्येटंल काय, वाट पहायाची आपली पुरी तयारी हाय, दैवाचीबी परीक्शा घेइन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... जीवाचा सखा गावंल काय, न गावंल काय, समदं ह्या कपाळी लिव्हल्यालं हाय, नशिबासंगं आज पैज लावीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... आयुक्शाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, धन्यासाटी आगीशीबी खेळने मंजूर हाय, डोरलं त्येच्याच नावचं गल्यात घालीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते ... एकाद्याले जीव लावून सार्थक जन्माचे होते, एकल्याने जगताना जगने अधुरे राहते, सजनाचे नाव फक्त माज्या नावासंगं जुळावे, साथ त्येची भेटली की जन्माचे सोने व्हावे, झोकून पिरेम करावे बस मागने नाही लय, समदे मिलून बोला जी, पिरमाचाच व्हावा जय... **************** प्रेरणा: http://www.misalpav.com/node/36609, http://www.misalpav.com/node/36747
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4940
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

ह्ये बी आवडल, फकस्त हिरवीनीचा शँडल लहान साईजचा अन त्या शँडल मधला पाय जरा मोठा वाटला. दोन्ही म्याच झाले असते तर लैच मज्जा आली असती. मग कदाचीत पहिल्या कविते पेक्षा ही कविता जास्त आवडली असती. पैजारबुवा,

विडंबन जरी असले तरी कविता वेगळी आहे आणि आशय मी गंभीरपणे घेतला आहे. आवडलीय रचना. "सजनाचे नाव फक्त माज्या नावासंगं जुळावे, साथ त्येची भेटली की जन्माचे सोने व्हावे, झोकून पिरेम करावे बस मागने नाही लय" मीही असंच प्रेम करीन म्हणतो. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रचेतस

+२

In reply to by उडन खटोला

+३