✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

न — नीलमोहर, Sun, 07/24/2016 - 22:00
सावळ्याची त्या जोगीन बनीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... राया तो माजा भ्येटंल काय, न भ्येटंल काय, वाट पहायाची आपली पुरी तयारी हाय, दैवाचीबी परीक्शा घेइन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... जीवाचा सखा गावंल काय, न गावंल काय, समदं ह्या कपाळी लिव्हल्यालं हाय, नशिबासंगं आज पैज लावीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते... आयुक्शाचे परश्न सुटले काय, न सुटले काय, धन्यासाटी आगीशीबी खेळने मंजूर हाय, डोरलं त्येच्याच नावचं गल्यात घालीन म्हनते, मी बी पिरेम करीन म्हनते ... एकाद्याले जीव लावून सार्थक जन्माचे होते, एकल्याने जगताना जगने अधुरे राहते, सजनाचे नाव फक्त माज्या नावासंगं जुळावे, साथ त्येची भेटली की जन्माचे सोने व्हावे, झोकून पिरेम करावे बस मागने नाही लय, समदे मिलून बोला जी, पिरमाचाच व्हावा जय... **************** प्रेरणा: http://www.misalpav.com/node/36609, http://www.misalpav.com/node/36747
  • ( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका

Book traversal links for ( मी बी पिरेम करीन म्हनते ) : प्रेमळ तडका

  • ( मी बी पिरेम करीन म्हनतो ) : टपोरी तडका ›

प्रतिक्रिया द्या
4920 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रेम करा हो.अवश्य करा.

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 22:15 नवीन
प्रेम करा हो.अवश्य करा. पण एकाच वेळी दोन-दोन स्थळी??? http://www.misalpav.com/node/36753
  • Log in or register to post comments

अरेच्या! प्रेमळ तडका आणि

गंगाधर मुटे
Sun, 07/24/2016 - 22:18 नवीन
अरेच्या! प्रेमळ तडका आणि टपोरी तडका हाय वाटते. स्वारी.रॉयली स्वारी.
  • Log in or register to post comments

अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 07/24/2016 - 22:20 नवीन
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर.. ओके -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

आग बया एकदम दोन दोन....

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 07/25/2016 - 09:28 नवीन
ह्ये बी आवडल, फकस्त हिरवीनीचा शँडल लहान साईजचा अन त्या शँडल मधला पाय जरा मोठा वाटला. दोन्ही म्याच झाले असते तर लैच मज्जा आली असती. मग कदाचीत पहिल्या कविते पेक्षा ही कविता जास्त आवडली असती. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

ही रचना आवडली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 07/25/2016 - 09:44 नवीन
विडंबन जरी असले तरी कविता वेगळी आहे आणि आशय मी गंभीरपणे घेतला आहे. आवडलीय रचना. "सजनाचे नाव फक्त माज्या नावासंगं जुळावे, साथ त्येची भेटली की जन्माचे सोने व्हावे, झोकून पिरेम करावे बस मागने नाही लय" मीही असंच प्रेम करीन म्हणतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता

संजय पाटिल
Mon, 07/25/2016 - 10:00 नवीन
विडंबन ऐवजी स्वतंत्र कविता म्हणून पण छान आहे
  • Log in or register to post comments

+१

प्रचेतस
Mon, 07/25/2016 - 14:06 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

+२

उडन खटोला
Mon, 07/25/2016 - 14:30 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+३

राजाभाउ
Mon, 07/25/2016 - 15:19 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा