तुझ्याशिवाय...
**तुझ्याशिवाय **
तुझ्याशिवाय ,
मन वेडे होऊनी झुलते,
उगीच का भरकटते!
स्वप्न-कळ्यांच्या उमलण्याची,
वाट पाहत बसते!!
सागरतीरी एकाकी,
का उदास होऊनी बसते!
खळखळणार्या लाटांच्या,
नादामध्ये विरते!!
स्वप्न असो वा सत्य,
मन तुजपाशीच रमते!
त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी,
तुझी कामना करते!!
- निलम बुचडे.
तुमची कामना पूर्ण होवो.
तुझ्याशिवाय
सुंदर लिहिता!!!
मांत्रिक
शेम टु शेम
ः-)) ः-))
पैजारबुवा, ही कविता मी