मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

डायरीचे पान

महासंग्राम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे दुःख ही जरासे पचले नाही, वेदनेला वाव कुठे जिंकला समर जरी तो, तरी सुखाची हाव कुठे झाली माणसे परागंदा, राहिले मज गाव कुठे रेखले होते तुझे नाव ज्याच्यात, हरवले ते डायरीचे पान कुठे #जिप्सी

वाचने 5287 वाचनखूण प्रतिक्रिया 17

खेडूत 17/06/2015 - 13:33
छान . जिंकले समर जरी ते असं हवं होतं का? (समर हा माणूस नसेल तर!) जिप्सी टोपण नावाने लिहिणाऱ्या कवीच्या काही कविता वाचल्या आहेत. ते आपणच काय?

In reply to by खेडूत

महासंग्राम 18/06/2015 - 14:25
इथे समर म्हणजे युध्द धरलेले आहे … मिपा वर माझी हि दुसरीच पोस्ट आहे …

वेल्लाभट 18/06/2015 - 14:08
थोडी मीटर-वजनात गंडली असली तरी चांगली आहे. छान. पण ते शेवटाला पा'न' आणि 'व' न जुळून आल्याने शेवट आवडता आवडता आवडला नाही.

In reply to by वेल्लाभट

महासंग्राम 18/06/2015 - 14:23
आपल्या सुचनेबद्दल धन्यवाद आपल्या सुचनेप्रमाणे अजून सुधार करण्याचा प्रयत्न करेन … असेच मार्गदर्शन असु दया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 19/06/2015 - 07:12
आवडली रचना. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

शब्दबम्बाळ 20/06/2015 - 15:41
छान लिहिलंय! एक प्रश्न, मज व्यथेची हाव कुठे, कुंपणाची धाव कुठे या ओळींमधून काय सुचित होत, कोणीतरी सांगावे…

In reply to by शब्दबम्बाळ

महासंग्राम 22/06/2015 - 10:21
दोन्ही ओळी वेगवेगळ्या आहेत मज व्यथेची हाव कुठे- कोणालाच स्वतःला दुःख , व्यथा मिळावी असे वाटत नाही, पण व्यथा नकळतपणे भेटते. कुंपणाची धाव कुठे- आणि कितीही व्यथा दुःखे भेटली तरी मनुष्य स्वतःभवती आखलेले रिंगण सोडत नाही. त्यातच समाधान मानतो . असे सुचित करायचे आहे.