मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चिंब

अर्व · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही नेईल काळजासी तो तुझा हात नाही एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही ईथे श्रावणाला आता धार नाही किती सरी जळाल्या वणवा वादळात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे... कमरेत वाकलेला वड उभा अंगणात... मन चिंब ही कितीदा भिजले पावसात... कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)

वाचने 2832 वाचनखूण प्रतिक्रिया 12

चित्रगुप्त Wed, 05/20/2015 - 08:52
आवडली कविता. आधीच्या पेक्षा सुगम आणि घट्ट बांधणीची. ......मी एकला कुठेसा बाकावरी विसावे.. क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे........ हे खासच.

चित्रगुप्त Wed, 05/20/2015 - 11:09
या निमित्ताने कवितेतील सुबोधता आणि निर्बोधता, गेयता आणि अगेयता, परंपरा आणि नवता, विस्कळितपण आणि नेटकेपण, छंदबद्ध आणि मुक्तछंद वगैरेंचा सौंदर्यानुभूतीशी कसा काय संबंध असू शकतो, यावर जाणकारांनी प्रकाश टाकावा, अशी विनंती करतो.