पाऊस झरला कितीदा माझ्या अंगणात
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
पाउस बरसे वरवर पोहचत आत नाही
नेईल काळजासी तो तुझा हात नाही
एकटाच सोडलीस तु भरल्या संसारात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
उबदार त्या मिठीचा आता ज्वार नाही
ईथे श्रावणाला आता धार नाही
किती सरी जळाल्या वणवा वादळात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
मी एकला कुठेसा बाकावरी विसावे..
क्षण राहीले जे काही ते ईथेच उसावे...
कमरेत वाकलेला वड उभा अंगणात...
मन चिंब ही कितीदा भिजले पावसात...
कवी : अर्व ( निशांत तेंडोलकर..)
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2842
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
धन्यवाद चित्रगुप्तजी...
आवडली!
या निमित्ताने कवितेतील
वाह..
कविता छान आहे, पुढील कवितेस
आवडली कविता
मस्तच
उसावे... म्हणजे?
उसावे म्हणा किंवा उसवावे..
वाह
धन्यवाद