बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk'
Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk'
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम
बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम..
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची
आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग
सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting ..
Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिकारी
वा , व्यवसायात मिळवू यश आकाशापरी..
आम्ही सोडणार नाही ती टपरी आणि तो हाफ कटींग
जीवनात अनमोल स्थान असलेली आहे ती "Very Important Thing"..!!
चलो इसी बात पे हो जाये एक........................ !!!! "हाफ कटींग" !!!!
-संदीप सरदेसाई
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रॉडक्शन चालू आहे... कस्टम
प्रॉडक्ट तपासणीसाठी कस्टम अधिकारी वल्ली यांना पाचारण करणेत यावे...अशी इनंती करनेत येत हाये...(लै काम वाढलय हल्ली)
नवकाव्य जिलबी संघ,
चालक-श्री पात्तळपिठेश्वर तांबेवाले
अहाहा
In reply to प्रॉडक्शन चालू आहे... कस्टम by अत्रुप्त आत्मा
काय नाव निवडलयं
फुSSट्लोSSSS वाचून
हाफ कटींग हि द्विरुक्ती नाहीये का???
द्विरुक्ती ..
In reply to अहाहा by मी-सौरभ
सौरभ दा.. हाफ कटींग ही द्विरुक्ती कशी काय बुवा? काही उमजले नाही हो...
कटिंग म्हणजेच हाफ
In reply to द्विरुक्ती .. by सन्दीप१२३३०
मित्रा, कटिंग म्हणजेच हाफ नव्हे का... मग हाफ कटिंग म्हणजे पाव चहा नाही का होणार... म्हणुन त्यास द्विरुक्ती असे म्हटले गेले असावे...
हेयर कटिंग
बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट
डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट
कॉलेजमध्ये करतात स्टाईल्स वेगवेगळ्या
मग मीच का उगाच आता राहू येडागबाळ्या
बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट
डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट
ऑफिसात आम्ही आता करूच कमी काम
सलूनमध्येच आता वेळ घालवत राहू जाम
बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट
डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट
तेल मालिश करूनी अंग घेऊ रगडून
सलूनमध्ये जोरदार टाकू बिल फाडून
बस हवा सलूनमध्ये आता एक हेयर कट
डोक्यावर फिरवा जरा वस्तरा झट पट
कार्पोरेट मध्ये जरी होऊ मोठे अधिकारी
तरी सलूनशी नाळ कधी तुटणारी नाही
आम्ही सोडणार नाही ते सलून आणि हेयर कट
कपाळावर उभरली आहे केसांची ती एक बट
चलो, इसी बात पे हो जाये एक.....!!!हेयर कट!!!
व...वल्ली व्वा...! मुळ
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
व...वल्ली व्वा...!
मुळ काव्याला खौनच टाकलत हो एकदम
वल्लीदा
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
खपलो!! :-D :-D :-D
छान वल्ली काका
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
छान वल्ली काका
क्या बात !!
In reply to हेयर कटिंग by प्रचेतस
क्या बात है वल्ली काका .... :-)
हेअर कटिंग चे सुंदर विडंबन पाहून चेहऱ्यावर आली स्माईल..
सलून चे दर्शन करविलेत, वाचल्यानंतर बदलून गेली हेअर स्टाईल ..!!! :))
प्रातिधानिक, विडंबनात्मक, अतिहास्यास्पद, सद्सतविवेकी, घ्रुणाहीन, कृपाभिलाषी, आसक्त आणि आशावादी अशा द्विरुक्तीबद्दल धन्यवाद.. सादर प्रणाम !!
धन्यवाद. पण हेयर कटींगचे
In reply to क्या बात !! by सन्दीप१२३३०
धन्यवाद.
पण हेयर कटींगचे विडंबन नाय केले हो. हाफ कटींगचे केले आहे. ;)
गलतीने मिस्टेक झाली बुवा..
In reply to धन्यवाद. पण हेयर कटींगचे by प्रचेतस
गलतीने मिस्टेक झाली बुवा.. मला धोनी आणि स्वत:स, बी.सी.सी.आय. समजून माफ करावे .. :D
उत्तम विडंबन वल्ली काकांच्या
उत्तम विडंबन
वल्ली काकांच्या या सल्ल्याची आठवण आली, आणि डोळे पाणावले :D
उगी उगी. रूमाल लावा.
In reply to उत्तम विडंबन वल्ली काकांच्या by स्पा
उगी उगी.
रूमाल लावा.
हल्ली स्पाकाकांचे डोळे
In reply to उत्तम विडंबन वल्ली काकांच्या by स्पा
हल्ली स्पाकाकांचे डोळे ज्या फ्रिक्वन्सीने पाणावतात त्याने कल्याण मनपाचा पाण्याचा प्रश्न सुटायला हरकत नाही. ;)
कल्याण मनपा नव्हे रे.
In reply to हल्ली स्पाकाकांचे डोळे by सूड
कल्याण मनपा नव्हे रे. कडोंमपा..
>>>कडोंमपा.. अश्लिल अश्लिल...
In reply to कल्याण मनपा नव्हे रे. by गवि
>>>कडोंमपा..
अश्लिल अश्लिल... (हे उगाच ;) )
हे गृहीत धरुन अनुस्वाराची
In reply to >>>कडोंमपा.. अश्लिल अश्लिल... by प्यारे१
हे गृहीत धरुन अनुस्वाराची जागा मुळातच नीट काळजीपूर्वक टंकली असल्याने काळजी नाही.. :)