फोनवर मंजूळ आवाजाने
हळुवारपणे संध्याकाळी
date ठरली
मी वेळेवर तयारीत पोहचलो
ती तयारच होती
मला पाहताच गोssड हसली
अनं माझा हात हातात घेतला
माझा हात तसाच हातात ठेऊन
तिने तिचे नेत्र मिटले
विचारात कुठेतरी हरवून गेली
ते सुरेख नेत्र उघडून
म्हणाली 'तुझे डोळे बघू!'
खुपवेळ ती माझ्या अनं मी तिच्या
डोळ्यात बघत होतो
एकटक, निरखून !!
परत तिने माझा हात हातात घेतला
हळूच घड्याळ बघून हसली..
अचानक माझ्या छातीलाच तिने कान लावले
छाती धडधडली, श्वास वेगावला
पण ती शांतपणे माझे चुकलेले ठोके ऐकत होती
अगदी मन लावून!!
एक निश्वास सोडून ती
तिच्या जागेवर बसली
पेन हातात घेऊन
गुलाबी कागदावर लिहू लागली
मी धडधडतचं होतो
धक्यातून मी अजून सावरलोचं नव्हतो
शेवटी सही करून तिने
कागद मला दिला
वाचतांना धडधड कमी झाली
Rx
Minor Viral Infection...
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3598
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे
हा हा हा
कविता छान .. अशी date आमच्या
धन्यवाद... अहो पण आमची वालीची
औषध काय दिले पण ???????????
औषध नल गे मला! कविता आवडली .
In reply to औषध काय दिले पण ??????????? by विनायक बेलापुरे
औषध नल गे मला! ऑ !! बापरे
In reply to औषध नल गे मला! कविता आवडली . by स्पंदना
औषध नल गे मला! अहो जरा
In reply to औषध नल गे मला! कविता आवडली . by स्पंदना
द्वैभाषिक?
In reply to औषध नल गे मला! अहो जरा by परिकथेतील राजकुमार
अरे पर्या माफ आहे त्यांना ..
In reply to औषध नल गे मला! अहो जरा by परिकथेतील राजकुमार
टार्या टार्या... अरे आज
In reply to अरे पर्या माफ आहे त्यांना .. by टारझन
आर्र्र ... ह्या अपर्णा काकु
In reply to टार्या टार्या... अरे आज by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद...