Skip to main content

date

लेखक अभिषेक९ यांनी सोमवार, 07/03/2011 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
फोनवर मंजूळ आवाजाने हळुवारपणे संध्याकाळी date ठरली मी वेळेवर तयारीत पोहचलो ती तयारच होती मला पाहताच गोssड हसली अनं माझा हात हातात घेतला माझा हात तसाच हातात ठेऊन तिने तिचे नेत्र मिटले विचारात कुठेतरी हरवून गेली ते सुरेख नेत्र उघडून म्हणाली 'तुझे डोळे बघू!' खुपवेळ ती माझ्या अनं मी तिच्या डोळ्यात बघत होतो एकटक, निरखून !! परत तिने माझा हात हातात घेतला हळूच घड्याळ बघून हसली.. अचानक माझ्या छातीलाच तिने कान लावले छाती धडधडली, श्वास वेगावला पण ती शांतपणे माझे चुकलेले ठोके ऐकत होती अगदी मन लावून!! एक निश्वास सोडून ती तिच्या जागेवर बसली पेन हातात घेऊन गुलाबी कागदावर लिहू लागली मी धडधडतचं होतो धक्यातून मी अजून सावरलोचं नव्हतो शेवटी सही करून तिने कागद मला दिला वाचतांना धडधड कमी झाली Rx Minor Viral Infection...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3598
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

हे minor नाही हो.. major आहे....

परवाच अशी खरीखूरी डेट झाली... आमचे ब्लड प्रेशर पन तपासले गेले होते. नॉर्मल आहे म्हणाली, माझा वीश्वास बसला नाही पण सांभाळून घेतल कारण तीची इंटर्नशीप चालू होती .

In reply to by टारझन

टार्‍या टार्‍या... अरे आज ऑफिसात अती श्रम झालेत का तुला ? ;) ते वाक्य त्यांचे नाही, उलट त्यांनी चुक पकडली आहे ;) वाच की मेल्या निट.