Skip to main content

आई मिटलेला श्वास १३: स्वप्नथेंबांची पालखी

लेखक गणेशा यांनी सोमवार, 24/01/2011 21:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई मिटलेला श्वास १२ शुन्य शब्दांत या भावनांची झोळी रक्तात उतरलेली सांजसंध्या कोवळी घनदाट आठवांचा सैरभैर पसारा अर्धओले मन सावळभाव गहिरा बधिर पावले ही तिमिरात थबकली अस्तित्वाची किनार क्षितिजापार बुडाली आई .. तुझ्या आठवांची पंक्ती आकाशी भिडलेली ह्रद्यस्थ माझ्या जपलेली तवअस्तित्वाची कोरीव लेणी... स्पंदणांच्या हिंदोळ्यावरी विचारांची अवखळ फ़ांदी दु:खाच्या तरंगावरती स्वप्नथेंबांची पालखी निशब्द शांततेत साठलेले काहुर मनातले अस्तव्यस्त हरवलेल्या मार्गावरती तुझी आशादायी मुर्ती... --------- शब्दमेघ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1839
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

फारच छान शब्दरचना .कवितेतल्या भाव अगदी मनाला भावले .

घनदाट आठवांचा सैरभैर पसारा अर्धओले मन सावळभाव गहिरा अतिशय छान. आई मिटलेला श्वास .फार सुरेख लय आणि कवितेवरची अप्रतिम पकड. फार वरच्या दर्जाची कविता !! +१

आई .. तुझ्या आठवांची पंक्ती आकाशी भिडलेली ह्रद्यस्थ माझ्या जपलेली तवअस्तित्वाची कोरीव लेणी... अगदी माझ्या मनातील भावच जणू...........