चल उसात दंगा करू
मंडळी, आप्ला ह्यो हिरो आन हिरवीन मस्तपैकी श्येताव आल्याली हायेत. त्ये काय करूं र्ह्यायलेय त्ये पाहू चला:
(पैकं नसल्यांनं एका डबड्यात ग्येल्येल्या पिच्चरमंधी ह्ये गानं टाकेल हाय.)
हिरो:
पिक आलं वयात आता
नको उशीर तू ग करू
अग पारू...
चल उसात दंगा करू
हिरो:
डोईवरी पदर घेवूनी आलीस मोठ्या नखर्याने सांग सजणी भ्यालीस का तू माझ्या असल्या वागण्याने?
हिरवीन:गाव बोलंना काहीबाही पन लगीन आपलं र्हायलंय ठरू लाजायची येळ गेली अन मी फिकीर कशाची आता करू
हिरो:आसंच आसलं तर मग अग पारू... चल उसात दंगा करू
हिरो:पाटपान्यात भिजलेत पाय लागल्यात मासोळ्या दिसू हात लागता हाताला मग डाळींबी दाण्यांना आलं हसू
हिरवीन:मी तर मैना लाडाची रे सच्या तुच माझा राघू तरीबी सांगते नका उगा कौतीक करू
हिरो:आरं..र्रर्रर्र.... अग पारू... चल उसात दंगा करू
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2961
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाषाणभेदजी
मला कवितेच
तुमचा
हाहाहा
In reply to तुमचा by चतुरंग
चल जोसात
शिर्षक लय
ऐन वेळेला संपवलीत...
ऐन वेळेला
उसातला
वात्रटपणा