Skip to main content

शेवट

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 03/12/2009 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता एकवारही मागे तुज बघता ना यावे? इतका का दुस्वास करावा..जाता जाता? चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली मागमूस याचा न उरावा..जाता जाता दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3930
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

=)) असो. कविता आवडली. - (पक्षीनिरीक्षक) भटोबा

In reply to by पिवळा डांबिस

>हा प्रेमाचा ४था पोपट दिसतोय!!! हा पहा चौथा राघू तोता तोता वाहत्या गंगेत भिजला जाता जाता

In reply to by पिवळा डांबिस

=)) =)) कविता मात्र सुरेख .. मात्रा वेलांटी वगैरे .. तशीही इकडे खोट काढायला जागाच नसते म्हणा :) - (मात्रा बद्ध) पोपटलाडू गुरू-लघु-लगु-गुरू-गुरू

मस्त --प्रभो ----------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

गझल आवडली. **(पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी द्विपदी -या विशेष आवडल्या.)**

---दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता---- झक्कास. उमराणी सरकार
न करा चिंता असाल सुखे| सकळ अरिष्टे गेली दु:खे

श्री बेसनलाडू, रचना आवडली नाही. मुखशुद्धी, बोलघेवडा हे शब्द अजिबात आवडले नाहीत.

मस्त गझल... :) मदनबाण..... Love is life. And if you miss love, you miss life. Leo Buscaglia

मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
अतिशय सुरेख..! तात्या.

लै भारी! ४था व शेवटाचा शेर विषेश आवडला ऋषिकेश ------------------ मनातली प्रतिक्रीया नेहमी लपलेलीच राहते का?

दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता ये जीवन है.. इस जीवन का यहीं है रंगरुप आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..

+१ मीनल.

श्री. लाडू, कविता आवडली. खूपच सुरेख. बिपिन कार्यकर्ते