हात मी तुझा हाती घ्यावा..जाता जाता
जन्म नवा तेव्हाच मिळावा..जाता जाता
सोबत घेतो तुझी नि माझी पत्रे काही
जरा तुझा सहवास घडावा..जाता जाता
एकवारही मागे तुज बघता ना यावे?
इतका का दुस्वास करावा..जाता जाता?
चुकून होते स्वप्नांमध्ये भेट आपली
मागमूस याचा न उरावा..जाता जाता
दु:ख वाढले नशिबाने, भरपेट जेवलो
मुखशुद्धीला हर्ष मिळावा..जाता जाता
मूक जीवनाशी ना माझे पटले क्षणभर
बोलघेवडा शेवट व्हावा..जाता जाता
काव्यरस
वाचने
3930
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरेच्चा!!
असो. कविता
In reply to अरेच्चा!! by पिवळा डांबिस
हा हा
In reply to अरेच्चा!! by पिवळा डांबिस
आगागागा
In reply to अरेच्चा!! by पिवळा डांबिस
आवडली
वा!
मस्त
आवडली
छान
चांगला प्रयत्न पण...
मस्त गझल...
मूक
लै भारी!
दु:ख वाढले
+१
सुरेख!!!
+ १ असेच म्हणतो!
In reply to सुरेख!!! by बिपिन कार्यकर्ते