Skip to main content

(सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप!)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी शुक्रवार, 18/05/2018 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा बघ मळतो कसा? चिमटीने घेत माप... सख्या चुन्यासवेच, आज मळ गायछाप! अजूनही न पाहिली, गोळी ती हातातली हळूच ठेवतो गालात, एक चिमुट गायछाप ! केशरी चुन्या वरुन, हात एक फेरला उद्या खाउ विलायती, आज मळ गायछाप ! शशीसम दंत तुझे, राहती कसे प्रिये?, मम वदनी पहा कशी, काळीभोर गायछाप ! कुरकुरीत चुर्‍यावरी, पिठूर चूर्ण पांघरु... उधाणला मस्तकात, तो जहाल गायछाप! तनू-मन झणाणता, पिसा समान वाटते हळूच वेच कण कण, मौल्यवान गायछाप ! पहाट उगवताच हात, शोधती पुडी तुझी कळ ही बसे रुसून, संपताच गायछाप ! पैजारबुवा,

सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा!

लेखक सत्यजित... यांनी शुक्रवार, 18/05/2018 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
बघूच धावतो कसा? खट्याळ चांदवा... सखे..फुलांसवेच आज माळ चांदवा! अजून पाहिली न मी भरात पौर्णिमा उगाच दावतो मला घड्याळ चांदवा!

उन्हाळी भटकंती: मधू-मकरंद गड ( Madhu Makarandgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 18/05/2018 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
पर्यटकांमधे प्रचंड लोकप्रिय असलेल्या महाबळेश्वरला प्रत्येक पाँईटवर दिवसभर हि गर्दी असते, मात्र संध्याकाळ होईल तशी या गर्दीची पावले वळतात, "मुंबई पॉंईट" किंवा आधीचा "बॉम्बे पॉईंट" कडे, अर्थातच सुर्यास्ताचा आनंद घेण्यासाठी. महाबळेश्वरच्या पश्चिम टोकावर असलेल्या या पॉईंटवर उभारल्यास उजव्या हाताला शिवभारताची साक्ष देणारा प्रतापगड खुणावत असतो. मात्र बहुतेक वेळा सुर्य बुडतो, तो एका खोगीराच्या आकाराच्या डोंगरामागे. सुर्यास्ताचे फोटो तर काढले जातात, पण हा सुर्यास्त ज्या डोंगराच्या मागे होतो आहे तो एक प्राचीन गड आहे, हे कोणाच्या गावीही नसते. या गडाचे नाव मोठे गोड आहे, "मधु-मकरंदगड".

रिमाताईना भावपूर्ण श्रद्धांजली.

लेखक शान्तिप्रिय यांनी शुक्रवार, 18/05/2018 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
रिमाताई लागू यांचा आज प्रथम स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या एका चित्रपटाच्या आठवणीने त्यांना श्रद्धांजली वाहात आहे. आपली माणसं हा मल्टीस्टारर चित्रपट १९८२ साली आला होता. मेलोड्रॅमॅटिक परंतु या जगात घडू शकेल किंवा घडलेली असेल अशी मधुकर तोरडमल यांची कथा. सुधीर भट यांचे समर्थ दिग्दर्शन ,उत्तम गीते आणि पार्श्वसंगीत आणि रिमा लागू व अशोक सराफ यांचा अष्टपैलू अभिनय यामुळे हा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड ठरला. कथा तशी साधीच ..... नायक (अशोक सराफ) व नायिका (रिमा) आपल्या संयुक्त कुटुंबात एक मध्यमवर्गीय जीवन जगात असतात. नायक कारखान्यात काम करीत असतो.

(अजुन) एक अध्यात्मिक संवाद !

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 18/05/2018 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ : बियर प्यायची अर्थात गुरुवार संध्याकाळ स्थळ : युनियन स्क्वेयर अर्थात #मी_हिरव्या_देशात_होतो_तेव्हा धागा वर्गीकरण : #मीचीलाल (संवाद संपुर्ण इंग्लिश भाषेत झालेला आहे केवळ मिपाच्या धोरणांचा आदर राखुन मराठीत अनुवादित करुन लिहिला आहे ) ------------- "हॅरे क्रिश्ना हॅरे क्रिश्ना क्रिश्ना क्रिश्ना हॅरे हॅरे | हॅरे रॅमा हॅरे रॅमा रॅमा रॅमा हॅरे हॅरे" " च्यायला, इथेपण ह्यांचा तमाशा सुरु आहे का " मित्र वैतागुन बोलला .

आठवणींचा पाऊस..!!

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 17/05/2018 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
तू जवळ पाहिजे होतीस ढग आज गरजला होता पाऊस तुला आवडतो हे तो उमजला होता -- बिनधास्त तुझ्यासारखा असा काही तो कोसळतो तू नव्हतीस म्हणून तूझ्यावरचं मीच भिजत होतो. -- माहित नव्हतं भिजायचं तुच मला शिकवलं होतं पावसात कोणाला कळलं नाही अश्रू मात्र ओघळलंं होतं -- थांबला पाऊस वारं सुद्धा मंदावलं होतं तुझ्या आठवणींच्या मातीने मन माझं गंधावलं होतं =====

भुलेश्वर

लेखक शाली यांनी गुरुवार, 17/05/2018 14:31 या दिवशी प्रकाशित केले.
मला महिन्याच्या शेवटच्या सोमवारी-मंगळवारी घरी बसने जमत नाही. मी नकाशावर माझ्या घराचा केंद्रबिंदू धरुन १०० किलोमिटर त्रिज्येचे एक वर्तुळ आखून घेतले आहे. रविवारी रात्री झोपताना तासभर या वर्तुळात डोके घालून बसले की काही न काही सापडतेच. गेले दहा वर्षे मी हेच करतो आहे पण अजुन काही पुर्ण वर्तुळ भटकुन पुर्ण झाले नाही. पण कधी कधी अगोदर पाहीलेलेच परत परत पहावे वाटते. अशा वेळी माझी पावले (चाके म्हणूयात) हमखास वळतात अशी काही ठिकाणे म्हणजे पुण्याजवळ असलेले रामदरा, यवत जवळ असलेले भुलेश्वर सिन्नर जवळचे गोंदेश्वर किंवा निघोजचे रांजण-खळगे. दिवस हमखास मस्त जाणार याची खात्री. यावेळेस भुलेश्वरला जायचे ठरवले.

मराठी बोला

लेखक साहना यांनी गुरुवार, 17/05/2018 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतीलआमच्या बिल्डिंग मध्ये एक हॉल `तेलगू समाजा`ने भाड्याने घेतला. त्या भागांत अनेक तेलगू लोक राहत असल्याने आणि बहुतेक उच्चशिक्षित असून त्याची मुले इंग्रजी शाळांत जातात आणि त्यांना तेलगू लिहायला वाचायला येत नाही. ह्या हॉल मध्ये एक प्रकारची सायं शाळा चालवायचा त्यांचा इरादा होता जिथे लहान मुलांना तेलगू भाषा, गीते शिकवली जातील, वृद्धांना येऊन चकाट्या पिटायला मिळतील आणि धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी करता येईल असा त्यांचा इरादा होता. सर्व काही सुरळीत झाले. त्यांनी कायद्याला अनुसरून मराठी, इंग्रजी भाषेतील फलक लावला आणि त्याच बरोबर भाला मोठा तेलगू भाषेतील फलक सुद्धा लावला.

कुतुबमिनार परिसरातील लोहस्तंभ - मूल स्थान इत्यादि - लेख ३.

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी गुरुवार, 17/05/2018 04:49 या दिवशी प्रकाशित केले.
(भाग १, भाग २)

विदिशेजवळची आणि कालिदासास ’नीचै:’ ह्या नावाने माहीत असलेली ही टेकडी म्हणजेच दिल्लीच्या स्तंभामध्ये उल्लेखिलेला ’विष्णुपदगिरि’ असा तर्क ठरल्यावर तिच्यावर तो ’विष्णुध्वज’ अशा वर्णनाचा लोहस्तंभ कोठे उभा असेल ह्याच्या शोधाचा प्रारम्भ होतो, आणि त्यासाठी आपणास प्राचीन भारतीयांच्या ज्योतिर्विज्ञानाकडे वळावे लागते.

मटण करताना आईने शिकवलेल्या काही गोष्टी

लेखक जेडी यांनी गुरुवार, 17/05/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
“तांबडा पांढरा रस्सा” यावरची स्वातीतैंचा पाकृ वाचत होते आणि त्यांनी पहिली स्टेप अशी लिहिलेय. ” १.प्रथम मीठ, आले, लसूण, थोडे पाणी घालून मटण शिजवून घ्यावे.” मला उगाच लगेच आईचा सल्ला आठवला म्हणजे फुकनी किंवा लाटणंच आठवले. आई मटण शिजवताना तेल गरम झाल्यावर कांदा, लसून आलं पेस्ट(ऐच्छिक), हळद, मीठ आणि मटण शिजत घालायची. हळदी मिठाने त्याला पाणी सुटते, त्याच पाण्यात मटण पहिले शिजवायचे, पण त्यात वरून पाणी घालायचे नाही. पुर्ण अंगच्या पाण्यात मटण शिजवून पुर्ण पाणी आठले कि मगच वरून पाणी घालायचे. ते ही पाणी मटण ज्या पातेल्यात शिजत घातले आहे ते पातेले खोलगट थाळी ठेवून झाकायचे. त्यात पाणी घालायचे.