macOS आणि iOS-6 (Batch resize photos)
या लेखात आज अजुन एक Automator Workflow पाहूयात.
आपल्याला बऱ्याचदा सोशल साईटवर इमेज अपलोड कराव्या लागतात. उदाहरणार्थ आपल्या 'मिपा’वर फोटो टाकायचे असतील तर अगोदर दुसऱ्या एखाद्या साईटवर अपलोड करुन येथे त्या ईमेजची लिंक द्यावी लागते. अर्थात लिंक बॉक्समध्ये मिपा तुम्हाला साईज विचारते. (मिपा सदस्यांसाठी फोटो टाकणे ही बरीच मोठी समस्या आहे.) पण ईतर साईटस् वर आपल्याला ईमेज resize करावी लागते. पण जेंव्हा एकापेक्षा जास्त ईमेज अपलोड करायच्या असतात तेंव्हा प्रत्येक ईमेज रिसाइज करणे जरा त्रासदायक ठरते. त्यासाठी आज आपण Automator वापरुन एक अॅप तयार करु.
मिसळपाव