लेखकमाहितगारयांनी गुरुवार, 14/06/2018 18:30 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिय बद्दल पुर्नवाचन करत आहे . मागच्या लेखात नेहरुंच्या पडदा पद्धतीच्या विरोधात असलेल्या प्रागतिक विचारांची दखल घेतली.
वस्तुतः भारतीय संस्कृतीच्या सकारात्मक बाजू विशेषतः भारतीय उपमहाद्विपातील विवीधतेतून एकता हे तत्व त्यांच्या डिस्कव्हरी ऑफ ईंडिया मधून जोरकसपणे मांडलेले आढळते. आणि हेच माझ्या या पुस्तकाबद्दलच्या आस्थेचे एक मुख्य कारण आहे.
लेखककहरयांनी गुरुवार, 14/06/2018 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते
भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये
क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते
हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण
हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते
सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा
तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते
तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही
काय करू मी? हाय!
लेखकशालीयांनी गुरुवार, 14/06/2018 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
मी या वेळेस "Out Of Office" मेसेजबद्दल माहिती देणार होतो. पण सकाळीच मित्राचा फोन आला. "नेटवर काहीतरी चांगला लेख वाचनात आलाय. एखादे सोपे ॲप असेल तर सांग. म्हणजे लेखाचे PDF करुन ठेवता येईल." मग त्याला थोडी-फार माहिती दिली. विचार केला अगदी छोटी आणि सर्वांना माहित असलेली माहितीच आज येथे 'मिपा’वर शेअर करावी. ज्यांना माहित नाही त्यांना याचा ऊपयोग होईल. "Out Of Office" मेसेजविषयी पुढच्यावेळेस लिहिन.
आज बाजारात Android, Windows आणि iOS साठी अनेक PDF ॲप्स ऊपलब्ध आहेत. त्यात अनेक ऊपयुक्त फिचर्सही आहेत.
लेखकशालीयांनी बुधवार, 13/06/2018 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
बऱ्याचदा काम करताना आपल्याला एकापेक्षा जास्त ॲप्लिकेशन्सची गरज पडते. त्यानुसार आपण ती ऊघडतो. पण ती सर्व आपण लगेच बंद करतोच असे नाही. कारण वेळोवेळी त्यांची आवश्यकता लागते. उदा. मी आता पेजेस मध्ये काम करत आहे. पण काही पॅरा हे मी नोटस् मध्ये ठेवल्याने ’Notes’ उघडलेले आहे. मला मधे मधे स्क्रिन-शॉट वापरायचे असल्याने 'Photos' हे अॅप पण ओपन केलेले आहे. मला फोटोबकेट मधल्या काही लिंक हव्यात त्यामुळे ’Safari' ओपन आहे. स्क्रिनशॉट एडीट करण्यासाठी 'PhotoScape' ओपन आहे.
लेखकसुबोध खरेयांनी बुधवार, 13/06/2018 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -९
पाण्याखालचे वैद्यकशास्त्र
आता पर्यंत आपण पाणबुडीतील व्यवहार कायकाय आहेत ते पाहिले. आता पाणबुडीतील सैनिकांना आणि डॉक्टरांना कोणत्या शारीरिक आणि मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते ते पाहणार आहोत.
लेखकसुबोध खरेयांनी मंगळवार, 12/06/2018 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
नेदरलँड्सची सफर भाग -४
एक दिवस ऍमस्टरडॅम मध्ये फिरण्यात घालवून दुसऱ्या दिवशी आम्ही क्यूकेनहॉफ येथे ट्युलिप उत्सव पाहण्यास सज्ज झालो.
या उत्सवाची तिकिटे तुम्हाला जालावर काढता येतात आणि हि तिकिटे शिफॉल विमानतळापासून तुम्हाला क्यूकेनहॉफला नेणे आणि आणणे या दोन्ही प्रवासाचा खर्च गृहीत धरूनही काढता येतात. हि सोय फारच चांगली आहे. कारण अगोदरच लिहिल्याप्रमाणे शिफॉल विमानतळ हा सर्व वाहतुकीनी युरोप आणि बाकी सर्व जगाशी व्यवस्थित जोडलेला आहे. त्यामुळे युरोपातील आणि बाहेरील पर्यटक तेथे रेल्वे, विमान किंवा बसने सकाळी येऊन संध्याकाळी परत जाऊ शकतात. असो.
लेखकलौंगी मिरचीयांनी मंगळवार, 12/06/2018 19:54 या दिवशी प्रकाशित केले.
ए पावसा !
थोडं थांबना .. मला जे सांगायचय
ते तुला कळतय का सांगना !
सारखच काय ते बरसायचं
सारखं आपलं भरायचं ,
आणि इथे येऊन सांडायचं
तुला नाहि का वाटत ,
थोडा आराम करावासा,?
आरामशीर ढगात बसुन
खालचा हिरवा गालिचा पहावासा ?
ए पावसा !
बास झालं बाबा आता , थोडं तरी ऐकना
तुझ्या मनात नक्कि काय आहे ? एकदा तरी सांगना !
ऐकलीस का कुजबुज कधी ,
“ साला किचाट करतो पाऊस
ह्याला कधीपण ढासळायची
कसली ती भारी हौस ?? “
मला तु आवडतोस
माझं काहिहि म्हणणं नै
पण मला नै आवडत ब्वॉ
तुला बोललेलं काइबाइ !
म्हणुन सांगते ..
लेखकशालीयांनी मंगळवार, 12/06/2018 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस मी macOS (iMac आणि MacBook) आणि iOS (iPad आणि iPhone) विषयी मला माहित असलेली माहिती देण्यासाठी एक सदर सुरु करावे म्हणत होतो. यात काही टिप्स असतील, ट्रबलशुटींग असेल किंवा मला आवडलेली काही ॲप असतील. किंवा ॲप्पलविषयीच्या नव्या बातम्याही असतील. पण प्रश्न होता भाषेचा. ईंग्रजीत तर लिहायचे नाही आणि मराठीत लिहायचे तर ईंग्रजी शब्दांना पर्याय सापडत नाही. म्हणजे निदान मला माहित नाहीत. मग ठरवले जमेल तसे लिहावे, सुचतील ते शब्द वापरावे.
तर आज अगदी साध्या गोष्टीने सुरवात करु. माझ्या डेस्कटॉपवर अनेक फोल्डर असतात. ज्यात माझ्या वेगवेगळ्या कामाच्या फाईल्स असतात.