Skip to main content

चंद्रिका

लेखक किल्ली यांनी बुधवार, 06/02/2019 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती. "कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला.

[शशक' १९] - दोघी

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळाच्या गर्दीत सिग्नल ला गाडी थांबली तशी तिने बाजूला पाहीलं. नेहमी प्रमाणेच रस्त्याच्या कडेला बंद दुकानासमोर ’ती’ बसलेली होती. जवळ लहान मूल. फाटके, मळके कपडे, केसांच्या झिंज्या, चारदोन भांडी व कपड्यांचा ’संसार’, चेहर्‍यावर दारिद्र्याच्या खुणा.... तिने मान फिरवली. ..इतके असूनही त्या लहानग्या मुलाच्या डोळ्यांतला आनंद व समाधान तिला अस्वस्थ करुन गेलं होतं. काय होतं त्याच्या कडे.? फक्त एक फाटका शर्ट आणि आधारासाठी “आईचा” हात! तिला घरी वाट बघत असलेली तिची दिड वर्षांची मुलगी आठवली. खूप खेळणी, कपडे आणि खाऊ यांच्या गराड्यात 'आईला' विसरायचा प्रयत्न करीत असलेली! खरंच...मुलांना काय हवं असतं....?

[शशक' १९] - ढवळाढवळ

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
टीडिंग...फोन वाजला, व्हॉट्सॲपचा कस्टम टोन असल्याने तो संपदाचा मेसेज असल्याचे आशिषच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशी परतण्याच्या बोलीवर, आईच्या वाढदिवसानिमित्त ऑफिसमधून परस्पर माहेरी गेलेल्या संपदाने तब्बल अठरा दिवसांनी काय मेसेज पाठवला असेल हा विचार करत आशिषने मेसेज वाचला. “तुला वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं” हनिमूनला गेलेल्या दिवसापासून आशिषच्या सासूने सकाळी, दुपारी, संध्याकाळी, रात्री मेसेज / फोन करून दोघांच्या वैवाहिक जीवनात अक्षम्य ढवळाढवळ करून त्यांचे आयुष्य निरस करून टाकले होते.

[शशक' १९] - सत्य कटू ते जहर वाटते

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 06/02/2019 12:55 या दिवशी प्रकाशित केले.
"मी आई होणार हे समजल्यावर तुला आनंद नाही झाला? मख्खासारखा जेवणावरुन उठून गेलास? किती विचित्र वाटले? आई बघ किती आनंदात आहेत, त्यांचे प्लॅनही सुरु झाले" “ भोळी आहे बिचारी, अज्ञानात सुखी आहे . पण माझे काय? तुझ्या सगळ्या टेस्ट निगेटिव्ह आहेत हे माहीत असूनही मी आनंदाचे नाटक करू? तू आई होऊच शकत नाहीस हे माहीत असताना खोटे बोलून काय मिळाले तूला? त्यापेक्षा दत्तक घेण्याचा पर्याय का स्विकारत नाहीस?” “मी मुल दत्तक घेणार नाही कारण माझे नाही तर तुझे रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. पण स्वत:चे न्यून लपवण्यासाठी तू दोष माझ्यावर ढकललास.... आणि ज्यावेळी हे मला समजले त्याचवेळी मी आई होण्याचा निर्णय घेतला.”

मैत्र - ५

लेखक शाली यांनी बुधवार, 06/02/2019 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
“अगं, किती ओरडशील त्याला? जातोय डॉक्टरकडे आम्ही” बाबा कपडे घालता घालता आईला म्हणाले. पण आईचा राग काही कमी होत नव्हता. “मला हौस आहे म्हणून चिडलेय मी! ‘जरा सडा घालायचाय, शेण आणून देतो का?’ म्हटलं तर तोंड फिरवून जातो हा. मग आता कशाला गेला होता त्या बैलाची शेपटी ओढायला?” म्हणत आईने ओट्यावर भांडे आदळले. काळजीपोटी बडबडत असली तरी मला आता वैताग आला होता तिच्या बडबडीचा. “काही होत नाही, जरासं तर लागलय” असं सगळ्यांना सांगता सांगता आता हात चांगलाच दुखायला लागला होता. इन्नीने लावलेल्या चंदनानेही काही फारसा फरक पडला नव्हता.

[शशक' १९] - बाळ

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 22:58 या दिवशी प्रकाशित केले.
"माझं बाळ कुठे आहे ?" बाळांतपणानंतर शुद्धीवर आलेल्या प्रितीने तिचा पती रोहनकडे विचारणा केली. "आलीस तू शुद्धीवर! वा देवच पावला. अग तो काय तुझ्या शेजारीच तर आहे पाळण्यात. कसा हसतोय बघ लबाड!" "अगदी तुमच्यावर गेला की हो. नाक डोळे तुमचेच घेतलेत. बर मला सांगा याच्या सगळ्या टेस्ट झाल्या आहेत ना ? नाही तर मागच्या सारखं.." रोहनने प्रितीच्या तोंडावर हात धरला. " तो भुतकाळ होता प्रिती! हा पाहूणा मात्र आपल्या सोबतच राहणार आहे. विश्वास ठेव." एवढ्यात रोहनचा मित्र , सुनिल तेथे आला.

[शशक' १९] - मासा

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणीला दगा देऊन व्हेरोनिकाशी सतिशने लग्न केले हे माझ्या पचनी पडले नाही. चांगला श्रीमंत मासा लागला होता माझ्या आणि श्रावणीच्या गळाला !! पुढच्या ऑस्ट्रेलियाच्या भेटीत मुद्दाम त्यांच्या घरी अचानक धडकलो . तिला बघून चाटच पडलो. इतकी सोज्वळ, सुंदर आणि सालस मुलगी ह्या ओबडधोबडला मिळाली याचा मला हेवा वाटला. गप्पा मारताना लक्षात आले की व्हेरोनिका फक्त सुंदरच नाही पण हुशारही आहे. विविध विषयात पारंगतही होती. चांगली मासोळी छे जलपरीच लागली की याच्या गळाला !! सतिश नसताना एकदा तिला मी या विषयावर छेडले तर तिच्या सोज्वळ चेहर्याचा रंग बदलला आणि रूक्ष स्वरात ती म्हणाली, "रेसिडन्स परमिट फुकट मिळतो काय?

[शशक' १९] - दैव 2

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
अंजीला तलाठ्याला मारायचे नव्हतेच मुळी.. पण तिला त्याची " ती " भूक भागवायचीदेखील नव्हती. . . . . . घाबरलेली अंजी सैरभर होऊन शेवटी मामाकडे आली होती. बापानंतर त्याचाच आधार होता. आईचा लांबचा नातेवाईक.. अडीनडीला तोच कमी यायचा. . . . . . म्या तुला कायबी हूं न्हाय देणार अंजे.. म्या हाये ना .. बघू पुढं काय करायचं.. माह्यावर इश्वास ठेव.. . जेवून घे आणि शांतपणे झोप.. . . . . . अंजी सुखावली. तिच्या गोऱ्या चेहऱ्यावर छानशी खळी पडली. टेकाडावरच्या काळूबाईचे मनोमन आभार मानत होती...

[शशक' १९] - संघर्ष

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
ती पळत होती पळत होती, जखमी होती तरी स्वतःचा जीव वाचवत होती फक्त आपल्या पिल्यांसाठी सैरभैर होऊन मागे पुढे पाहून कोण आपल्या मागे बंदूक घेऊन लागलं आहे हे पाहून ती पळत होती पण जखमी असल्याने ती हवा तसा प्रतिकार करू शकत नव्हती पण तिला पळणं भाग होतं आपल्या पोटासाठी . आपल्या वस्तीपासून ती खूप लांब आली होती फक्त आपलं आणि आपल्या पिल्यांच पोट भरण्यासाठी ती या मानवी वस्तीत आली होती पण तिची काही चूक नसताना आज तिला माणसांनी घायाळ केलं होत त्यांच्या स्वार्थासाठी .त्याच माणसांनी तिचं घर उध्वस्त केलं होत जंगले नष्ट केली होती वाघीण असून पण आज ती पळत होती

[शशक' १९] - निरागस

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळची लगबग. ससुल्याला प्रांगणला पाठवायची व तिला ऑफीसला पळायची घाई. केवळ दीड वर्षाच्या, शांत झोपलेल्या पोटच्या गोळ्याला तिने पापे घेऊन उठवलं. त्याचं आवरायला सुरुवात केली. मनात विचार. डबा रोज संपलेला असतो म्हणजे नीट जेवत असणार, रोज हसून बाय करतो म्हणजे त्याला पाळणाघर आवडलंय. महिनाभरापासून लागलेल्या अपराधीपणाच्या बोचणीतून सुटका होणार या समाधानाने तिने नि:श्वास सोडला. कपडे घालताना तो तिला बिलगू लागला. तिच्या अंगावर रेलू लागला. तिलाही ते हवं होतं पण घड्याळाकडे बघून तिने मन आवरलं. रिक्षाचा आवाज येताच तो रिक्षापाशी चालत गेला, आणि मागे वळून म्हणाला “आई! मी पांगनमदे तुदी वात बगून येतो.