Skip to main content

[शशक' १९] - गॅस चेंबर

लेखक वकील साहेब यांनी मंगळवार, 05/02/2019 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
"मला बाहेर काढा हो, मला बाहेर काढा." सहाव्या मजल्यावर अडकलेल्या लिफ्ट मध्ये फक्त तो एकटाच जीवाच्या आकांताने ओरडत होता. "पहिल्यादाच लिफ्ट मध्ये चढलाय वाटत." अशा नजरेने त्याच्याकडे बघत उर्वरित सहा जण स्थितप्रज्ञाप्रमाणे उभे होते. "जनरेटर पाच मिनिटात सुरु होईल," बाजूचा म्हातारा समजावत त्याला म्हणाला. "हात जोडतो हो, पाया पडतो कुणी तरी बाहेर काढा मला." पुन्हा कितव्यांदा तरी त्याची आरोळी घुमली. अन तशीच विरली.

मैत्र - ४

लेखक शाली यांनी मंगळवार, 05/02/2019 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऊद्यापासून ग्रेड परीक्षा असल्यामुळे तिन दिवस कॉलेजला सुट्टी होती. आम्ही सरांकडून लॅबमध्ये काम करायची परवानगी घेवून ठेवली होती, त्यामुळे कंटाळा यायचा फारसा प्रश्न नव्हता. कॉलेज सुटायच्या अगोदर दहा मिनिटे सखाराम सगळ्या वर्गांमधून सर्क्यूलर फिरवून गेला होता. ग्रेड परिक्षा झाल्यानंतर या वर्षीच्या वक्तृत्व स्पर्धा होणार होत्या. विषय होता ‘हुंडा-एक वाईट प्रथा’. त्यामुळे जोशीसर फार उत्साहात होते. विषय लक्षात घेता, मुलिंनी यात खासकरुन भाग घ्यावा अशी त्यांची ईच्छा होती. तरीसुध्दा याही वर्षी कप आमच्याच कॉलेजकडे रहावा म्हणून त्यांनी मला आणि शामला तयारी करायला घरी बोलावले होते.

[शशक' १९] - ऑर्डर

लेखक साहित्य संपादक यांनी मंगळवार, 05/02/2019 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
टिंग! मोबाइलवरचा गेम थांबवून त्याने कंप्युटरच्या स्क्रीनकडे पाहिलं. अजून एक ऑर्डर. बाहेर महामूर पाऊस आणि त्यात या ऑर्डरी. स्क्रीनवर पोरांच्या लोकेशन्स पाहिल्या आणि त्याने एक शिवी हासडली. सगळी पोरं बाहेर अडकली होती. वेळेत ऑर्डर पूर्ण करायची तर त्यालाच जावं लागणार. बायकोच्या माहेरी सांगायला फक्त टिम लीडर...

जयपूर आणि उदयपूर बद्दल माहिती

लेखक सान्वी यांनी मंगळवार, 05/02/2019 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, पहिल्यांदाच या विभागात लेखन करत आहे. आम्ही म्हणजे आम्ही दोघे व आमचे सव्वा वर्षांचे चिरंजीव पुढच्या आठवड्यात जयपूर आणि उदयपूर ला जाणार आहोत. जाणकार मिपाकरांनी व ज्यांनी या आधी ही ट्रिप केली असेल त्यांनी जरा आपले अनुभव सांगावे. २ दिवस जयपूर आणि २ दिवस उदयपूर असा प्लॅन आहे. राहण्याची सोय यजमानांच्या ऑफिस हॉलिडे होम मध्ये झाली आहे. प्रश्न फक्त हा आहे की प्रत्येकी 2 दिवसात कुठले must watch स्पॉट्स करावे? सोबत लहान बाळ आहे त्यादृष्टीने सांगावे. जयपूर चे हवामहाल न उदयपूर चे सिटी पॅलेस तर ऑलरेडी आहे लिस्ट मध्ये . तसेच शॉपिंग कुठे व कसली करावी?

[शशक' १९] -  गुरु

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:23 या दिवशी प्रकाशित केले.
उजवा हात कापून झाला तेव्हा उसासे सोडत त्याने माझ्याकडे बघितले. पांढरा धूर सोडत मी सिगारेट त्याच्याकडे सोपवली. बाजूलाच एक चौकोनी बकेट ठेवली होती. रुंद काळपट टेबलावर विखुरलेले तुकडे तिच्यात भरून ठेवले.

[शशक' १९] - क्रॉस कनेक्शन

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
तो : आज नक्कि ना ? मी : हो . तो : कसं ओळखायचं ? मी : लाल रंगाचा कुर्ता ,पांढर्या रंगाचा पायजमा घालेन . तो : मी ऑरेन्ज शर्ट त्यावर ब्लॅक लाइन्स ,काळी पँट. मी : ९ वाजता . भारत कॅफे . तो : डन . .पहिल्यांदाच भेटणार होतो . सोशल मिडियावरची ओळख . एक्साइटेड.

[शशक' १९] - कल्याण

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
मुलासाठी माध्यम मराठी की इंग्रजी निवडावं? हा प्रश्न पडला होता. मायमराठीत प्राथमिक शिक्षण उत्तम हे तज्ञांचं मत योग्य वाटत होतं. इंग्रजी माध्यमातली मुलं स्पर्धेत पुढे जातात. तिथेच मुलाचं कल्याण होईल असं जनमत होतं. मराठी माध्यमात प्रवेश घेऊन आपण मुलाच्या कल्याणात बाधा आणली असं नको व्हायला म्हणून निमूटपणे इंग्रजी नर्सरीसाठी प्रवेश घेतला.

[शशक' १९] - भूक

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 04/02/2019 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
जंगलापासून जवळच काही डोंगर होते. त्यापलीकडे माणसांची वस्ती होती. तो त्या बाजूला फारसा फिरकत नसे. जंगल त्याच्या गरजांसाठी पुरेसे होते. एकदा तो पलीकडे गेला. माणसांच्या वस्तीत फिरून आला. फिरून फिरून तो दमला. त्याला भूक लागली. फार करकचून भूक लागली. पण ही नेहमीसारखी साध्यासुध्या मांसाची भूक नव्हती तर ही होती 'माणसाच्या' मांसाची भूक ! ते कसे मिळवावे? तो विचारात पडला. कोल्हा हुशार होता, लोक त्याच्या हुशारीला लबाडी म्हणत. पण लोकांच्या बोलण्याकडे किती लक्ष द्यायचे? तर कोल्ह्याने युक्ती केली.

क्रश (शतशब्दकथा)

लेखक किल्ली यांनी सोमवार, 04/02/2019 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वप्रकाशित असल्यामुळे स्पर्धेसाठी देता येणार नाही. म्हणून इथेच टाकत आहे, बघा जमलीये का.. सूचनांचे स्वागत आहे :) -------------------------------------------------------------------------------------------- छोट्या गावातून शहरात नोकरीला आलेल्या त्याला तिचं राहणीमान एकदम स्टॅंडर्ड वाटत असे.

हा कुणाचा फोटो आहे ? ( स्पर्धेबाहेरची शशक १ )

लेखक खिलजि यांनी सोमवार, 04/02/2019 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
" अजून चहा दिला नाही हिने . हिचं ना कालपासून मी बघतोय लक्षच नाही आहे. वृषा, ए वृषे , काय झालंय तरी काय हिला. बहिरी झाली आहे का ? का, माझ्याच घरात मलाच किंमत उरली नाही आहे ? " मी स्वतःशी म्हणालो. वृषा : " सोनू , पिल्लू , उठा चला , दोन घास खाऊन घ्या . कालपासून पोटात अन्नाचा कण नाही आहे. आपल्याला लवकर पोहोचायचं आहे तिथे " काहीच समजत नाही आहे मला . अरे काय चाललंय काय ? चहाचा पत्ता नाही आणि हि इथे फोटो कुरवाळत बसलीय. अरे हे काय ,हि तर माझा फोटो बघून रडतेय. सिद्धेश्वर विलास पाटणकर