"शलाका!"
बसस्टॉपवर काकांनी एका पाठमोर्या मुलीला हाक मारली.
त्या मुलीनं मागे वळून पाहिलं.
"देशपांडे काका! काय म्हणताय? बर्याच दिवसांनी गाठ पडली."
"हो.हल्ली फारसं येणं होत नाही इकडे!"
"हो.बाबा बोलले मला.काळजी घ्या बरं तब्येतीची!"
"हो तर घ्यायलाच पाहिजे.तुझ्या लग्नात हिंडता फिरता यायला हवं मला.काका हसत हसत म्हणाले."
"लग्न!" शलाकाच्या कपाळावर आठ्या!
का गं? काय झालं?
"नै काही नाही!"
"अगं योग्य वयात लग्न झालेलं चांगलं"
"हो काका पण मनासारखं स्थळ तरी यायला पाहिजे ना?"
"कसं स्थळ हवंय तुला? सांग मला"
"आता पुण्यातले खर्च तुम्हाला माहितीच आहेत.त्यामुळे पगार जरा चांगलाच हवा हो!"
"चांगला म्हणजे किती?"
"किमान ५ लाखाचं तरी पॅकेज असावं"
"हे किमान?"
"हो.तेवढे लागतातंच"
"शलाका! अगं ३२ वर्षांची आहेस तू! जेमतेम BA आहेस.केवढ्या या अपेक्षा?"
"काका! आता आहेत भरपूर अॉप्शन मुलींसाठी मग काय बिघडलं? शलाका हसत हसत म्हणाली"
"बरं तुझ्या दादाचं काय? त्याची ती 'ऐटीतली नोकरी' काय म्हणतेय? त्याचं कुठे जुळलं की नाही?"
"चाललीय बरी! परवा आली होती एक मुलगी सांगून"
"मग? सरकलं का पुढे?"
"छे हो! मुलीनंच नकार दिला!"
"का बरं?"
"दादापेक्षा तिचं पॅकेज जरा जास्त होतं.म्हणजे दादाला ३९ आहे तिला ४१ होता."
"२ हजारासाठी?"
"हो"
"कठीणाय"
"जाऊ दे नाहीतरी ती मुलगी तोंडावरुन जरा गर्विष्ठच वाटत होती.होकार दिला असता तरी शोभली नसती दादाला"
"तू म्हणतेस म्हणजे असेल तसंच!" काकांनी कसंबसं हसू दाबत म्हटलं.
"अच्छा! काका बाय!" बसकडे पळता पळता शलाका!
बस डोळ्यापुढून जाईपर्यंत काका हसतंच होते.
(काल्पनिक संवाद)
वाचने
13369
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
मार्मिक
शलाका पळुन गेली ... काकांनी
प्रयत्न चांगला आहे.
अहो त्यांना लाख म्हणायचे
In reply to प्रयत्न चांगला आहे. by विनिता००२
"दादापेक्षा तिचं पॅकेज जरा
In reply to अहो त्यांना लाख म्हणायचे by आनन्दा
अरे वा! नवीन माहिती!
In reply to प्रयत्न चांगला आहे. by विनिता००२
या दोन वाक्यांबाबत अधिक
"कठीणाय" :)
आमच्या एका स्नेहींची मुलगी आय
लग्न झाल्यावर काही तरी खुसपट
In reply to आमच्या एका स्नेहींची मुलगी आय by सुबोध खरे
लग्न झाल्यावर काही तरी खुसपट
In reply to आमच्या एका स्नेहींची मुलगी आय by सुबोध खरे
हा सध्याचा एक ज्वलंत प्रश्न आहे
सगळीकडे वाईट, केवळ पैशाला आणि
घ्या
In reply to सगळीकडे वाईट, केवळ पैशाला आणि by गवि
..आणि ही पहा तरुण मुलांची
In reply to घ्या by अभ्या..
ऑ
In reply to ..आणि ही पहा तरुण मुलांची by गवि
कृष्ण निघाले वैकुंठाला,
In reply to ऑ by अभ्या..
=))
In reply to कृष्ण निघाले वैकुंठाला, by mrcoolguynice
सगळ्याच मुली वाईट?
In reply to सगळीकडे वाईट, केवळ पैशाला आणि by गवि
हे राम..
In reply to सगळ्याच मुली वाईट? by श्वेता२४
काळ्या रंगाबद्दल नकारात्मकता
In reply to सगळ्याच मुली वाईट? by श्वेता२४
@ मराठी कथालेखक
In reply to काळ्या रंगाबद्दल नकारात्मकता by मराठी कथालेखक
मानवी त्वचेचा रंगाला काळा
In reply to @ मराठी कथालेखक by श्वेता२४
आँ ???
In reply to सगळीकडे वाईट, केवळ पैशाला आणि by गवि
तो मुविंचा हजारी धागा काढूयात वर
अरेरे . काय हा दैवदुर्विलास
छान काल्पनिक संवाद आहे , आवडला
खिलजि
In reply to छान काल्पनिक संवाद आहे , आवडला by खिलजि
बाकी देशमुखांसारखे 'समजुतदार'
In reply to खिलजि by उपयोजक
नाव गाव फळ फूल =))
In reply to छान काल्पनिक संवाद आहे , आवडला by खिलजि
आज म्या भरून पावलो है .. आमची
In reply to नाव गाव फळ फूल =)) by जेनी...
पार = परत
In reply to आज म्या भरून पावलो है .. आमची by खिलजि
खिलजी =))
In reply to आज म्या भरून पावलो है .. आमची by खिलजि
एक पूस्प्गुच , म्हणजे
In reply to खिलजी =)) by जेनी...
हाहाहा... तुम्हाला नविने
In reply to एक पूस्प्गुच , म्हणजे by खिलजि
नै नवीन नै कै .. गुदगुल्या
In reply to हाहाहा... तुम्हाला नविने by जेनी...
लग्न
कोणाचं चुकतय नक्की?
साला मै आता आमच्या खानदान का
हिहिहि.
In reply to साला मै आता आमच्या खानदान का by भीमराव
सैन्याला आवरा ! नाही तर नंतर
In reply to साला मै आता आमच्या खानदान का by भीमराव
या सगळ्यातून गेल्ये त्यातून
आमचा मामा डॉक्टर आहे त्याचे
In reply to या सगळ्यातून गेल्ये त्यातून by वीणा३
लग्न झाल्यावर काही तरी खुसपट
अजून नाही
In reply to लग्न झाल्यावर काही तरी खुसपट by अमेरिकन त्रिशंकू
हुंडाविरोधी कायद्यात प्रीनप
In reply to अजून नाही by आदिजोशी
आजकाल अशा घटना इतक्या जवळून
In reply to अजून नाही by आदिजोशी
उद्देश काये या धाग्याचा नक्की
इतक्या नकारात्मक होऊ नका.
In reply to उद्देश काये या धाग्याचा नक्की by एमी
हे ठीकच आहे. त्यातले 'कोणतीही
In reply to इतक्या नकारात्मक होऊ नका. by सुबोध खरे
अॅमी
In reply to उद्देश काये या धाग्याचा नक्की by एमी
ओके. पण प्रतिसाद दांभिकतेवर
In reply to अॅमी by उपयोजक
१+
In reply to ओके. पण प्रतिसाद दांभिकतेवर by एमी