कंटाळा आल्यावर घरच्या घरी तुम्ही काय खाता ?
मंदार भौंचा बाजार आमटीवाला धागा पाह्यला आणि डोक्यात किडा वळवळला बघा.
तुम्हाला कधी अस होत का कि लयी कंटाळा आलाय आणि घरात असलेल काहीच खावस वाटत नाही ? मला तर खुपदा होत अस.
मग काहीतरी झोलझाल करून मी नाही नाही ते खात बसतो, शाकाहारी असल्यामूळ थोडी मर्यादा येते पण काय हरकत नाही.
१) शिळा भात असला आणि तो थोडासा मोकळा असला कि त्यावर कच्च तेल टाकून + आपल्याला झेपेल इतके लाल तिखट + मीठ टाकून मस्त हाणतो, सर्दी झाली असल तर नाक मोकळ होत आणि तोंडाला चवही येते.
२) वरचाच प्रकार थोडा मोल्ड करून पोह्याला वापरायचा त्यात आवडत असल तर घरचे घट्ट दही टाकायचे कधी कधी + कोथमिर मारायची थोडी वरून.
मिसळपाव
ती मॉडर्न सावित्री होती
वडा च्या फांदीची पूजा तिला मान्य नव्हती
-
तीन वडा च बोन्साय विकत आणलं व यथासांग पूजा केली
-
दारावर टकटक झालं तीन दार उघडलं
-
दरवाज्यात एक तीन फुटी माणूस उभा होता
-
अरे तू कोण ?
-
सावित्री मी सत्यवान तुझा पती
-
अर्रे तू तर चागला पाच फूट आकरा इंच उंच होता तुज असं कस झालं ?
-
तू वडा च बोन्साय पूजला वडा न मला बोन्साय केलं
-
तिच्या डोळ्या समोर पारंब्या लोम्बु लागल्या व ती बेशुद्ध पडली