मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मुलाखत अंश: गव्हर्नन्स ववर्नन्स आणि बोलाचीच् कढी

mrcoolguynice · · राजकारण
मुलाखत : सुब्रमण्यम स्वामी (भाजप / बीजेपी राष्ट्रीय नेते) मुलाखतकर्ता : संजय पुगलिया सु स्वा : आज नरेंद्र मोदींना हेच सांगतोय, निवडणुका ह्या कधीही इकॉनॉमिक परफॉर्मन्सवर जिंकता येतच् नाही. ना नरसिंहा राव जिंकले, ना वाजपेयी जिंकले (इंडिया शायनींग च्या नावाने), ना मोरारजी जिंकले (भाववाढ रोखाण्याच्या मुद्द्यावरून)... या दुनियेत , लोकांच्या भावनांना हात घालूनच् (जागं करून) जिंकतात (निवडणुका)... सं पु: सर मग् हे जे क्रिटिक्स आहेत, त्यांचाच मुद्दा तुम्हीखरा सिद्ध करत आहात... (तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ) गव्हर्नसने (सुशासन) , परफॉर्मन्सने, आश्वासनाच्या पूर्ततेने निवडणुका जिंकता येत नाहीत ... सु स्वा : होय सं पु: तर इमोशन्स व भावनेला हात घालूनच् निवडणुका जिंकता येतात ... सु स्वा : होय सं पु: असे म्हणुन , ज्या सरकावर (मोदी सरकार), तुम्ही पॉसिटीव्ह समालोचना करता, ... त्याच सरकारला तुम्ही असे म्हणुन (खुललंमखुल्ला ) लायसन्स देत आहात की , काम-वाम करू नका .... फक्त हिंदुत्वावर फोकस करा ... (फक्त)निवडणुका जिंकणेंच् जरुरी आहे.... हे म्हणजे फक्त सत्ता सुंदरीच्याच मागे धावण्यासारखे आहे ... (पत्रकाराला मधेच काटून .... ) सु स्वा : नाही नाही , हे बघा , निवडणुका कश्यासाठी असतात .... सत्तेसाठी नसतात ? आम्ही काय आश्रमात जायला काय परवानगी मागण्यासाठी लढतो का ? सत्तेतूनच जास्तीतजास्त कामे होऊ शकतात. भावना भडकावणे हे वाईट नियतचे काम नाहीये. हिंदूंची प्रभुसत्ता व अस्मिता त्याला आपल्याला उजळायला पाहिजे. आजपर्यंत काय राजकारण झालेय ७० वर्ष्यात .. हिंदूंना जातीत विभागा प्रांतात विभागा भाषेत विभागा वर्णात विभागा ... हिंदूंचे विभागुन ... अल्पसंख्याक यांना एकत्र करा. ख्रिश्चन मुस्लिम त्यांचे १५-१६% आणि एससी ओबीसी यांना बरोबर घेऊन , उमेदवार त्याप्रमाणे देऊन , ते त्यांची मेजॉरिटी बनवायचे , हेच चालत होते (परंतु)... बीजेपीने २०१४ मध्ये पहिल्यांदा .... आणि मी आर एस एस चे आभार मानू इच्छितो की ... ते पहिल्यापासूनच याच् विचारांचे होते (भावना भडकवण्याचा), परंतु आम्ही लोकं (बहुदा त्यांना राजकीय विंग म्हणायचे असावे)मानत नव्हतो ... आम्ही म्हणजे जनसंघाचे लोक सुद्धा मानत नव्हतो ... वाजपेयींनी तर त्या (भावना भडकवण्याचा आयडियेला ), एकदमच ठोकरून दिलेले २००४ मध्ये , त्यामुळे (वाजपेयी) पराभूतदेखील झालेले. ही नवी रणनीती बनली (2014 बीजेपी + आर एस एस ची) ,की ह्याच्या (आतापर्यंत चालत आलेल्या पद्धतीच्या) बर्रोब्बर उलट करूया आपण , हिंदूंचे कन्सॉलिडेशन करण्यासाठी , आपण हिंदूंच्या (भावना भडकवण्याचा) अश्या गोष्टी केल्या पाहिजे की हिंदू एकत्र (पोलराइज) झाला पाहिजे , विभागला न जावा ... (मात्र त्याचवेळी) मुस्लिमांच्यात महिलांना वेगळं पाडा ... ट्रिपल तलाक देऊन (मुद्दा पुढे आणून) इतर गोष्टी करून ... बोहरा शिया यांना सुद्धा वेगळं वेगळं पाडा , आणि हे सुन्नी जे आहेत खास करून वहाबी सुन्नी यांना वेगळं वेगळं पाडा ... तर आपण जिंकू ... आणि त्याच फॉर्मूलाने आम्हाला मेजॉरिटी मिळाली ... हे गव्हर्नन्स ववर्नन्स हे सगळं बोलाचीच् कढीआहे (बोलबच्चन आहे), त्याच्यामुळे (गव्हर्नन्समुळे) नाही जिंकलो. (पत्रकाराला हसायला आलं... ) दोनच गोष्टींवर ९०% (निवडणुकीत २०१४ च्या )विजय मिळाला . १. नरेंद्र मोदींची प्रतिमा , प्रचारासाठी एका प्रतिमेची (मुखवट्याची ) गरज होती , ती मिळाली (नरेंद्र मोदींच्या रूपाने), आणि २ नरेंद्र मोदींना देशभर फिरवलं , त्यातून एक विश्वास निर्माण करता आला , की गुजरातेत त्यांनी (जे काही(कदाचित त्यांना २००२ म्हणायचे असावे चूभूदेघे)) जे केलंय ते इथेही करता येईल.

वाचन 9716 प्रतिक्रिया 0