युगांतर - आरंभ अंताचा भाग 23
युगांतर-आरंभ अंताचा
भाग २३
हस्तिनापुरात आनंदाचे ढोल, नगारे वाजत होते. आपल्या अनूजाला पुत्र होणार ही वार्ता कळल्यावर धृतराष्ट्राने मिष्टान्न वाटले. सर्व नगरीत अन्न-वस्त्र वाटून भीष्मांनी पंडुकडेही मिष्टान्न पाठवले.
"प्रणाम महाराज !"
"शकुनी.... बोल."
"महाराज, तुम्ही काय करताय हे?"
"काय करताय म्हणजे? स्वागत करतोय! राजपरिवाराच्या नव्या सदस्याचे! आनंद साजरा करतोय मी शकुनी!"
"पण कसला आनंद महाराज?"
"अरे तू ऐकलं नाहीस? पंडुला पुत्रप्राप्ती....."
"ते ऐकलं महाराज. म्हणूनच आश्चर्य वाटते आहे तुमच्या वागण्याचे!"
"पण का? त्यात आश्चर्य वाटण्यासारखे आहे तरी काय?"
"महाराज तुम्ही विसरता आहात.
मिसळपाव