Skip to main content

युगांतर आरंभ अंताचा भाग २५

लेखक मृणालिनी यांनी शुक्रवार, 09/08/2019 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
देवकीने कंसाच्या पायाला जड बेड्यांनी सुजलेल्या हातांचा विळखा घातला. "भ्राताश्री.....हा सातवा पुत्र आहे, भ्राताश्री. सातवा आहे. आठवा नाही." कंसने चिडून पाय झटकला. रडणाऱ्या नवजात बालकाला घेऊन निघून गेला. 'गेलास? घेऊन गेलास शेवटचा उरलेला आशेचा किरण सुद्धा? "आमची सर्व आपत्ये तुझ्या हवाली करेन" असं म्हणत पतीचा जीव वाचवला...... तेव्हा कुठे माहित होतं? आपण निवडलेला पर्यायी मार्ग विषारी काट्यांचा असेल.... कुठे माहित होतं? त्या काट्यांचं विष जीव न घेता असं सतत रक्तात भिनत मृत्यूपेक्षाही भयंकर यातनादायी जीवन बनेल.... कुठे माहित होतं? कंस क्रूरतेच्या सर्व सीमा लांघून देईल....

काश्मिर भारताला लाभदायक आहे की तापदायक

लेखक तमराज किल्विष यांनी शुक्रवार, 09/08/2019 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल चाललेल्या घडामोडी पाहता काश्मीर चे विभाजन करून केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करणे व उर्वरित भारताचा कायदा प्रस्थापित करण्यासाठी हालचाली झाल्या. यासाठी मुळ हेतू काश्मिरचे भले व्हावे, सैनिकांची हानी थांबून खोऱ्यात शांतता प्रस्थापित व्हावी हा आहे. पर्यायाने पाकिस्तान ची नांगी ठेचली जाईल व पुढेमागे पाकव्याप्त काश्मीर परत घेता येईल. पण माझ्या बुध्दीच्या आकलनाप्रमाणे माझी मतं मांडत आहे. सहमत असण्याची अपेक्षा नाही. फक्त मला काय वाटतं ते सांगतो. काश्मिर मध्ये जाऊन उद्योग धंदे उभारण्याचे स्वप्न पाहणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे. काश्मिर हे अफगाणिस्तान, पाकिस्तान यांचीच आवृत्ती आहे.

मनोरुग्नाचा विषय

लेखक शिवाजी पाटील यांनी गुरुवार, 08/08/2019 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
मनोरुग्न होतांनां येणारी शारीरीक व मानसीक दुर्बलता नमस्कार, मी, शिवाजी पाटील सद्या मनोविकार/डिप्रेशन/मानसीक पिडा या विषयावर माझे स्वत:हाचेच अनुभव व्यक्त करीत आहे कारण हे मला अतिआवश्यक वाटतात माझे वय27 आहे मी जिल्हा जळगाव,महाराष्ट्र येथील रहीवासी गेल्या 1 वर्षा पासुन मी मनोरुग्नच होतो.मी पदविचे शिक्षण घेत स्पर्धापरिक्षा देत होतो पदवीनंतरही अभ्यास चालु होता वारंवार होणार्या परिक्षा खर्च,अपयश खंबीर मनाने सामना करीत होतो.4ते5 वर्ष त्याच परिरीस्थीतीत कारण मी शेती ही करतो आर्थीक अडचन नेेहमीच भासत होती,मुंबईत रु12,000महीन्याची एक कंत्रीटी नौकरी भेटली 1वर्ष काम केले दुसर्या वर्षी सेवा समाप्त केली गेली

युगांतर- आरंभ अंताचा भाग २४

लेखक मृणालिनी यांनी गुरुवार, 08/08/2019 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"महाराज, दास वार्ता घेऊन आला आहे." "अनुमती आहे." "महाराजांचा विजय असो. महाराज, तुमच्या अनुज पंडुंना द्वितीय पुत्र प्राप्त झाल्याची आनंदवार्ता आहे. ऐकण्यात आले आहे की वायुदेवांचा वरदहस्त आहे युवराजांच्या माथी." 'युवराज? आत्तापासून पंडुपुत्राने राजगादीवर अधिकार जमवायला सुरवात केली?' धृतराष्ट्राच्या मनात तिडिक गेली. भीष्माचार्य आनंदाने उठून दासाजवळ आले. एक दागिना त्याच्या हातात ठेवत त्यांनी पंडुकडे काही राजभेट वस्तू पाठवून दिल्या. धृतराष्ट्र आता आतून जळू लागला. 'आपल्या अनुजाला दोन पुत्र प्राप्त झाले आणि आपण अजूनही नि:संतान? आता नाही!

श्रीगणेश लेखमाला २०१९ - झलक दुसरी!

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 08/08/2019 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी खेळताना नाही का, आधी सुरू असलेल्या खेळात कोण्या नवीन भिडूची येंट्री होणार असली की अगोदर राज्य असणारा भिडू लगेचच 'नवा गडी, नवं राज्य' ही घोषणा करून मोकळा व्हायचा! नवीन आलेल्या भिडूने राज्य घ्यायचं आणि खेळ पुढे सुरू व्हायचा. अगदी तस्संच, आम्हीसुद्धा म्हणतोय - "नवा आठवडा, नवी झलक!" ह्या वेळच्या श्रीगणेश लेखमालेसाठी आपण कोणत्या विषयाचं बंधन ठेवलं नव्हतं. एकाच विषयाशी बांधून न घातल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरचे लेख आलेत. श्रावणात एखादं इंद्रधनू फुलल्यागत जणू. त्याचीच ही आणखी एक किंचितशी झलक. बघा बरं, ह्या वेळेस जमतंय का ओळखायला कोणाच्या लेखणीमधून उतरलंय हे लिखाण.. जमलं का, जमलं?

वाळूचे विरहगीत

लेखक मायमराठी यांनी बुधवार, 07/08/2019 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
।। वाळूचे विरहगीत ।। उन्हात चमके साज रुपेरी, खेचत नेई ओढ ना टळे। पसरुनी चमचम धरतीवरती, पाहुनी रात्री चांदही चळे। उधाण घेऊनी नायक येई, भिजवुनी जाई अंगही बळे। राग न यावा यात तिलाही, सरसर लाटेमागुनी पळे । अर्ध्यामुर्ध्या खुणांत रुतवी, निरोपांचे शंखशिंपले । जीव मोहरे येता भरती, युगायुगांचा नवस फळे। सुना किनारा होता ओहोटी, मुकी वेदना गात्रं छळे । सोडुनी जाई घाव जिव्हारी, त्या लाटांना हे न कळे । वाहत येई गाळ सुगंधी, ज्या वासाचे तिस लळे । खेळ मांडला पृथ्वीवरती, खेळणी वाळू सागर सगळे । रित्या नद्या होत तरीही, गोड होई खारे सगळे । अजाण सागर याच रहस्यी, वाळूमधुनी विरह ओघळे । पाय आपले जात रु