वर्डप्रेस की ब्लॉगर? कोणता ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी योग्य आहे?
ब्लॉग/वेबसाईट तयार करण्यासाठी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. यात वर्डप्रेस व ब्लॉगर हे सर्वाधिक वापरले जातात. अनेकांना प्रश्न पडतो की फ्री उपलब्ध असणारे ब्लॉगर न वापरता वर्डप्रेस का वापरावे? सुरवातीला मला देखील हा प्रश्न पडला होता. याविषयी मी माझ्या ब्लॉगवर लिहलेला लेख इथं 'मिसळपाव'च्या वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित करत आहे.
वर्डप्रेसचे ही दोन प्रकार आहेत.
१. wordpress.com २. wordpress.org
यापैकी पहिले वर्डप्रेस हे एक प्रकारे ब्लॉगर सारखेच आहे. दुसरे वर्डप्रेस ओपन सोर्स आहे. आपण दुसरे वर्डप्रेस व ब्लॉगर याविषयी बोलणार आहोत.
१) मालकी
ब्लॉगर ही गुगल मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. परंतू यावरील कंटेंटची सर्व मालकी ही गुगल कडे असते. गुगल त्याला वाटेल तेव्हा ही सेवा बंद करू शकते. याउलट वर्डप्रेस हे सेल्फ होस्टेड असल्याने आपल्याला हव्या त्या होस्टींगवर ठेवता येते. यामुळे यावरील कंटेंटची मालकीही पुर्णपणे आपल्याकडे असते.२) कंट्रोल
ब्लॉगरवर ठरावीकच पर्याय उपलब्ध असून यात काही बदल हवे असल्यास ते शक्य नाही. ब्लॉगरसाठी मोजक्याच थीमस उपलब्ध आहेत. अनऑफीशील उपलब्ध असणार्या थीमस देखील हव्या तितक्या उपयोगी नाहीत. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने यात आपण हवे ते बदल करू शकतो. एखादे फीचर हवे असल्यास लाखो फ्री व पेड प्लगइन्स उपलब्ध आहेत. टेक्निकल माहीती असेल तर स्वतःचे हवे तसे प्लगइन्स तयार करणे देखील वर्डप्रेसमध्ये शक्य आहे.३) सुरक्षा
ब्लॉगर सोबत तुम्हाला गुगलची मजबूत सुरक्षा मिळत असल्याने चिंता करण्याची गरज नाही. वर्डप्रेस सेल्फ होस्टेड असल्यामुळे याची जबाबदारी आपल्यावर येते. सध्या तरी अनेक होस्टींग कंपन्या या सुविधा मोफत अथवा अतीशय अत्यल्प मोबदल्यात देतात. यासाठी काही प्लगइन्स देखील उपलब्ध आहेत. यामुळे याची खुप चिंता करण्याची गरज नाही.४) खर्च
ब्लॉगर ही गुगल मार्फत दिली जाणारी मोफत सेवा आहे. यासाठी आपल्याला एक रूपयाही मोजावा लागत नाही. वर्डप्रेस होस्टींगसाठी आपल्याला काही पैसे मोजावे लागतात. प्रीमीयम थीम्स, प्लगइन्स हवे असल्यास हा खर्च वाढू शकतो.५) सपोर्ट
ब्लॉगरसाठी विशेष असा काही सपोर्ट उपलब्ध नसला तरी वर्डप्रेससाठी फोरमच्या माध्यमातून मोफत सपोर्ट उपलब्ध आहे. वर्डप्रेस फोरमसोबतच होस्टिंग व थीमस कंपन्या स्वतःचा वेगळा सपोर्ट देखील देतात.६) सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन
ब्लॉगर गुगलचे प्रोडक्ट असल्याने सर्च इंजिन रंकिंगमध्ये फायदा होतो हा समज मला तरी खोटा वाटतो. उलट वर्डप्रेसमध्ये सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशनसाठी विविध प्लगइन्स उपलब्ध असल्याने खूप टेक्निकल माहिती नसली तरी सर्च इंजिन ऑप्टीमाइझेशन करता येते.७) भविष्य
२३ ऑगस्ट १९९९ रोजी Pyra Labs या कंपनीने ब्लॉगर सेवा सुरु केली. २००३ मध्ये गुगलने Pyra Labs विकत घेतले. तेव्हापासून यात कोणतेही विशेष अपडेटस करण्यात आले नाही. याउलट वर्डप्रेस ओपन सोर्स असल्याने वेळोवेळी अपडेट व नविन फीचर्स येत असतात. याचमुळे वर्डप्रेस जगातील सर्वात पंसतीचा सीएमएस ठरला आहे. केवळ ब्लॉगीगसाठी मर्यादित असणारे वर्डप्रेस आता बिझनेस, ई-कॉर्मस यासाठी देखील वापरण्यात येत आहे. जगातील जवळपास ३०% वेबसाईटस वर्डप्रेसवर आहेत.
याद्या
12904
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
माहितीपुर्ण धागा.
तुषारांचा सल्ला उपयुक्त वाटला...
ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा?
In reply to तुषारांचा सल्ला उपयुक्त वाटला... by शशिकांत ओक
वाह, खूप छान, ऑनलाईनतुषार !
In reply to ब्लॉगरवरून वर्डप्रेसवर ब्लॉग कसा स्थलांतरित करायचा? by onlinetushar
धन्यवाद
In reply to वाह, खूप छान, ऑनलाईनतुषार ! by चौथा कोनाडा
उत्तम लेख!
विस्तृत माहिती द्याल का?
In reply to उत्तम लेख! by सोन्या बागलाणकर
विस्तृत माहिती द्याल का?
In reply to उत्तम लेख! by सोन्या बागलाणकर
मलाही
In reply to विस्तृत माहिती द्याल का? by kool.amol
मलाही
In reply to विस्तृत माहिती द्याल का? by kool.amol
वर्डप्रेस ऍडवरटायझिंग हा एक स्वतंत्र विषय आहे!
In reply to मलाही by शशिकांत ओक
मराठीत टायपिंग
गुगल इनपुट टूल
In reply to मराठीत टायपिंग by उपाशी बोका
माझ्या माहितीप्रमाणे GOOGLE
In reply to गुगल इनपुट टूल by महासंग्राम
तुषारजी सुरु आहे अजून क्रोम
In reply to माझ्या माहितीप्रमाणे GOOGLE by onlinetushar
मंदारजी क्रोम एक्सटेन्शन आहे
In reply to तुषारजी सुरु आहे अजून क्रोम by महासंग्राम