Skip to main content

जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

लेखक प्रास यांनी बुधवार, 18/12/2019 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात. कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं. वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं. पं.

कविकल्पना

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 18/12/2019 08:52 या दिवशी प्रकाशित केले.
पंख मिळावे कल्पनांचे आकाश व्हावे कागदांचे भावनेची बनून लेखणी मनपाखरू स्वछंद उडावे शब्द व्हावे जाणिवांचे स्पर्श त्यांना अर्थांचे विचारांची करून मांडणी कवितांनी जन्म घ्यावे ध्यास लागो तालासुरांचे वेड लागो मज बोलांचे त्या बोलांची बनून गाणी रसिकांनी गात रहावे
काव्यरस

जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा

लेखक माहितगार यांनी बुधवार, 18/12/2019 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
कवि एका जनार्दनी श्री गुरुदत्ताचा भक्त जाणा । श्री गणपती देवी पार्वती महादेव वीष्णू ब्रह्मा आदी देवतांचे नमन म्हणा। सर्वांना आपलेसेकरी हिंदूधर्माच्या सकारत्मक भगव्या उत्क्रांती कळसाचा उद्घोषम्हणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। विवीधगुणात्मक ख्रिसमसट्री देव हा जाणा। सगुणी अवतार वनस्पतीलोकीचा राणा। राम भेटी मुग्ध म्हणे जये हनुमाना । गुरुवर्य येशुयोगीबोले त्रिमुर्तीअनेकदेवाद्वैत सर्वाठायी जाणा। जयदेव जयदेव जय श्री ख्रिसमसट्री देवा । आरती ओवाळितां नुरली भवचिंता। जयदेव।।धृ।। सबाह्याअभ्यंतरी तु एक वटवृक्षदेव। अभाग्यासी कैची कळेल ही मात।

लघुकथा – नजर

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 17/12/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
उमा आज आपल्या मैत्रिणीच्या घरी(पद्मिनी) कामानिमित्त कडे आली होती. पद्मिनीची आई शांता काकू उमाच्या सख्या नसल्या तरी जुन्या भावकीतील नातेवाईक होत्या. पद्मिनी वर्ग मैत्रिण असल्यामुळे उमेचे तिच्या घरी जाणे येणे होत असे. पद्मिनी सोबत तिच्या खोलीत बोलत असताना सहजच निरागस पणे सांगीतले की, तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात तिला बघायला पाहुणे येणार आहेत असे सुद्धा सांगीतले. चहा-पाणी केल्यानंतर उमा घरी गेली. उमाला पाहुणे बघायला येण्याचा दिवस जसा जवळ येत होता तसा उमेच्या मनात उत्सुकता, भीती आणि डोळ्यात नवीन संसाराची स्वप्न तरळत होती.

(गंमत केली" म्हणालास तू)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 17/12/2019 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्राची ताईंनी केलेले या मोठ्या दुनियेचे वर्णन आपल्या मिपा वर्ल्ड ला पण चपखल बसते. "गंमत केली" म्हणालास तू मिपा वर पण सगळे पेटले तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. प्रतिक्रियले असंख्य त्यावर धागा नवा तू जेव्हा काढला मते वाचता एकेक खवचट मनी असंख्य तरंग उठले. नुसते +१, ठाक कोरडे पोचते तरी बघ बोच त्यातली. आभ्यास वाढवा, चपला घाला डू आयडी ने पिंकून टाकले . म्हणो कुणी ही मिपा दुनिया नाही शाश्वत फक्त दिखावा. तुलाही ठाऊक मलाही ठाऊक खरे कोण अन् खोटे कुठले. पैजारबुवा,

चौकटींतील रत्ने

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 16/12/2019 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाचा पूर्वार्ध: रोज आपण एखादे तरी छापील वृत्तपत्र चाळतो. त्यात बातम्या आणि जाहिरातींव्यतिरिक्त काही नियमित सदरे असतात. वृत्तपत्रानुसार सदरांचे स्वरूप वेगवेगळे असते. पण बहुतेकांत समान असणारी एक गोष्ट म्हणजे शब्दकोडे. शब्द्कोड्यांचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे काळ्यापांढऱ्या चौकटीयुक्त शोधसूत्रे दिलेले कोडे. त्यात उभ्या आणि आडव्या रांगेत शोधायच्या शब्दांचा सुरेख संगम होतो. ही कोडी नियमित सोडविताना सामान्यज्ञान, भाषा, इतिहास, भूगोल, विज्ञान, संस्कृती आणि समाज अशा अनेक क्षेत्रांत विहार करता येतो.

अहिराणीनी बात

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 16/12/2019 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रमा मराठीन्या तशे पाह्य त्ये पासष्ट बोलीभाशा दखातीस. त्या बठ्ठास्मा अहिराणी भाशाना पट्टा आडवा उभा भयान मोठा त्ये शेच, पन ह्या पट्टामजारला आथा तथा कामसकरता जायेल लोक महाराष्ट्रभर आनि महाराष्ट्रना बाहेरबी आपली भाशा इमाने इतबारे बोली र्‍हायनात- समाळी र्‍हायनात. नाशिक सिडको, औरंगाबाद, पुना, मुंबई, सुरत आशा काही शहरस्माबी आज अहिराणी भाशा हात पाय पसरी र्‍हायनी. (आज अहिराणी बोलनारा लोक येक कोटीना आसपास दखातंस.) शिकेल सवरेल लोकसतीन अडानी लोकस्ले अहिराणीवाचू दुसरी भाशा येत नही म्हनीसन का व्हयेना त्या नाइलाजे आपापला घरमा- गावमा अहिराणीमा यव्हहार करतंस.

(कपाळ)मोक्ष!! :-)

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 15/12/2019 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व व्यर्थता उमजत असते तरि चित्ताला थारा नसतो संदेशाची तिच्या प्रतीक्षा मी प्रतिचातक बनुनी करतो हस्तसंच मज गमे उपांगच क्षणिक दुरावा असह्य होतो 'अजुनी उत्तर का येईना?' प्रश्न मनाला कच्चा खातो सतरा कामांचा खोळंबा भार्या घोष ठणाणा करते तरी पालथी घागर माझी आंतरजालावर गडगडते शेवटची कधि 'दिसली' होती किती त्यावरी प्रहर लोटले मोजुन घटिका तिज गमनाच्या पंचप्राण कंठाशी रुतले अन्य पुरुष तर नसेल कोणी? भिवविति लाखो शंका हृदया 'निळ्या खुणे'ला विलंब होता चलबिचले मम अवघी काया कुठे वावगे, अधिक-उणे कधि चुकून बोलुन मी गेलो का, तपासतो ते पुनःपुन्हा मी तरी न होई निरसन शंका अखेर उगवे सूर्यासम ती हर्षवायु मज

"ती" काळरात्र !

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शनिवार, 14/12/2019 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या चिमुलवाड्यावरील बाळा हा तसा गडी माणूस. आजकाल वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या "कामवाल्या" असतात ती सिस्टिम आमच्या वाड्यावर अजूनही आलेली नाही. धुणी-भांडी करायला शांताबाई आणि बाकीची जी म्हणून काही कामे असतील ती करायला हा बाळ्या. एकंदरीत स्वयंपाकघरात बाळ्याचे काही काम नसे व उरलेल्या घरात शांताबाईचे ! तर एवढ्या घरची एवढी कामे करून बाळ्या बाकड्यावर बसून विड्या फुकत असे. बाकी आम्ही लहान असताना गोविंद मामा आम्हाला कानातून आणि नाकातून विडीचा धूर काढून दाखवायचे ! "डोळ्यातल्यानूय काडटा हा पय !" असेही ते आम्हाला सांगायचे पण कित्तीतरी वेळा बारकाईने पाहून सुद्धा डोळ्यातला धूर काही आम्हाला दिसला नाही.