
गेल्या रविवारी "ट्रिपल एम" म्हणजे मेथी मुर्ग मलई चा बेत केला. सोबत तव्यावर केलेले कणकेचे (व्हिट) तंदुरी गार्लिक नान.
चिकन (साधारण ९०० ग्राम) ला कसुरी मेथी, दही, आलं लसूण, गरम मसाला लावून घेतला. हे रात्रभर किंवा किमान ४ तास मॅरीनेट करत ठेवावे (फ्रिज मध्ये).
कांदा (२ माध्यम आकाराचे), आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून, तेलावर परतून घेतली. थोडी हळद तिखट घातली. २ जुड्या मेथी बारीक चिरून ह्यात घातली आणि भरपूर परतून घेतली (आधी कडू लागते, पण कडवटपणा भरपूर परतून घेतल्यामुळे कमी होतो). ह्यात चिकन टाकून आता ते परतून घ्या (पाणी नको, चिकन ला पाणी सुटेल त्यात शिजवायचे आहे). झाकण लावून मंद आचेवर शिजवून घ्या (साधारण ३० ते ४५ मिनिटे). चवीनुसार मीठ घालून मर्जीनुसार ह्यात फ्रेश क्रीम घालावे!
गार्लिक नान साठी आपली नेहेमीची कणिक घावी, जरा जाडसर पराठा/नान लाटावा. एकीकडे एक लोखंडी तवा (नॉन-स्टिक नको, कारण आपण तो उलटा करून नान भाजणार आहोत) गॅस वर तापवत ठेवावा.
आता नान ला एकाबाजूने पाणी लावावे. पाणी लावलेली बाजू तव्यावर टाकून गॅस कमी करावा. वरच्या बाजूला, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर आणि कलोंजी हाताने थापावी. नान वर थोडे फोड आले कि तवा उलटा करून आता लसूण लावलेली बाजू गॅस वर धरून सगळीकडून नीट भाजून घ्यावी.
नान ला ब्रशने मस्त बटर लावावे.

[ वरील फोटो हे मागे केलेल्या गार्लिक नान चे आहेत, यावेळेला पोरांना भुका लागलेल्या त्यामुळे फोटो नाही काढले करतानाचे ]
गरम गरम, नान मेथी मुर्ग मलई चिकन सोबत सर्व्ह करावे.
शाकाहारी लोकांनी चिकन ऐवजी पनीर किंवा मशरूम वापरून करावे. अर्थात मॅरिनेशन रात्रभर ची गरज नाही. मशरूम घालून उत्तम लागतं हे.

प्रतिक्रिया
वॉव.
मंडळ आभारी आहे! :-)
In reply to वॉव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच म्हणतो
In reply to वॉव. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या हो सरपंच! ;))
In reply to असेच म्हणतो by प्रशांत
कहर
आभारी आहे! _/\_
In reply to कहर by चांदणे संदीप
जबरदस्त
जवळचा आमिर चिकन वाला (५००
In reply to जबरदस्त by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वाह
मी लिहिलंय की नान चे फोटो
In reply to वाह by मीअपर्णा
आभार
In reply to मी लिहिलंय की नान चे फोटो by केडी
उलट्या तव्या
In reply to मी लिहिलंय की नान चे फोटो by केडी
वर म्हंटल्याप्रमाणे ह्यावेळी
In reply to उलट्या तव्या by चौकस२१२
मस्त रेसिपी
केडी (म्हणजे कायम डेलिशिअस)
श्री केडी सर
सरपंच! क्या केहने!
In reply to श्री केडी सर by प्रशांत
भाजले