मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कशास मग ते मोठे व्हावे?

मनोज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आव नको की ठाव नको जड टोपण नाव नको सरड्या सारखे असुदे जीवन कुंपणापर्यंतही धाव नको उगीच तुम्ही मोठे व्हा मोठे होणे जपत रहा पडला का कुठे डाग नीट ते शोधून पहा पाषाणातून देव नको टाकीचे मग घाव नको चार चौघात फिरताना मिळणारा तो भाव नको मंदिराचा कळस मोठा देवा सारखा मान खरा नको अलिप्त मोठेपणा मी पायरीचा दगड बरा नको रेशमी वस्त्र भरजरी समारंभात घालायला असुदे मी रूमाल सुती जखमेवरती बांधायला का अथांग सागर व्हावे खारटपणाचे दोष घ्यावे होऊन मी इवलासा झरा तहानलेल्यास घोट द्यावे कशास मग ते मोठे व्हावे? आतून आतून रिक्त रहावे भले वाटते छोटे व्हावे गरजे साठी धावूनी यावे

वाचने 6931 वाचनखूण प्रतिक्रिया 18

ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 06/11/2020 - 11:57
जबरदस्त द्वैअर्थी कविता, जितके सोज्वळ शब्द आहेत तेवढीच चावटही आहे. (अर्थात कोणता अर्थ घेउन वेंजॉय करायची हे वाचकाच्या दृष्टीकोनावर अवलंबुन आहे) जिओ लैच आवडल्या गेली आहे. पैजारबुवा,

In reply to by प्रचेतस

प्रसाद गोडबोले गुरुवार, 06/11/2020 - 17:02
कविता सुंदर आहेच शंकाच नाही का अथांग सागर व्हावे खारटपणाचे दोष घ्यावे होऊन मी इवलासा झरा तहानलेल्यास घोट द्यावे >>> =))))