सद्दाम आणि हिटलर
मी महाविद्यालयात असताना 'मॉडेल युनायटेड नेशन्स असेंब्ली' या पूरक उपक्रमात मी ३ वेळा भाग घेतला आहे. या उपक्रमात दोन विद्यार्थ्यांचा संघ संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील एकेका देशाचे प्रतिनिधीत्व करतो.असे एकूण ३० ते ४० संघ मी भाग घेतलेल्या वेळी होते. त्या सर्व संघांपुढे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत पारित झालेला ठराव मांडण्यात येतो आणि त्यावर त्या विद्यार्थ्यांनी आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या देशांची भूमिका मांडणारे भाषण करायचे आणि इतर देशांचे प्रतिनिधीत्व करणार्या विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांची 'बिनपाण्यानी' करायची.
मिसळपाव