Skip to main content

उड्डाण पूल

लेखक इनोबा म्हणे यांनी बुधवार, 02/01/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता मी संकलीत केलेली आहे.मुळ कवीची माहिती कवितेखाली दिलेली आहे. या उड्डाण पुलावरून वाहेल गर्दी एकविसाव्या शतकातली, त्याही वेळी असतील आसर्‍याला आलेले वळचणीचे संसार पुलाखाली. आता हे जणू ठरूनच गेलेले, अंगणातले नवे फोफावणारे झाड पाहून जशी यावीत पाखरे चोचीत काडी घेऊन घरट्यासाठी तशी माणसेही असतातच वळचणीच्या शोधात नव्या पुलाच्या नव्या आढ्याखाली. नवजात चोचीतला चिवचिवाट ऐकताना रोज सकाळी आपण भिडवू कौतुकाची नजर घरट्यावर, पुलाखालील उघडी बाघडी मुले पाहून मात्र आपण थुंकू पचकन बर्वे किंवा कर्वे रस्त्यावर. कविता संग्रहः शब्द मनातले कवी: अतुल व्यं.देशमुख प्रकाशकः ग्रंथविशेष प्रतिष्ठान © सौ.स्मिता देशमु

(कातरवेळी)

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 02/01/2008 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मृण्मयीताईंची सुरेख कविता कातरवेळी येती स्वप्नी तव बाबा कधीतरी कातरवेळी जुन्या आठवांनी उठती कळा उरी कातरवेळी नकोस रे कालिंदीच्या तटी करू छेडाछेडी घरीच जाऊ नसे माझा पतीघरी कातरवेळी नकोस तू पव्वा काढू माझ्यापुढे सायंकाळी थरारते देहामधली नशाचरी कातरवेळी कधी कटीशी लोंबे ती, कधी दिसे छातीपाशी तुमान ही असते परी खुंटीवरी कातरवेळी असे उंबऱ्याचे कुंपण, करात या हिरव्या बेड्या तरी बोंबलत ही दिसते वेशिवरी कातरवेळी कळे तुझ्या नसण्यामधली अवीट मज गोडी तेव्हा छळे तुझे असणे जेव्हा परोपरी कातरवेळी सभोवताल हे गंधाळे, तुझ्या नुसत्या येण्याने (पड

सोन्याची शिर्डी

लेखक जुना अभिजित यांनी बुधवार, 02/01/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
एका धनाधिशाने शिर्डीवाल्या साईबाबाला सोन्याचं सिंहासन दान/भेट दिलं किंवा अर्पण केलं आणि भक्तांच्या मनमंदिरात वसणारा फकिर सिंहासनस्थ झाला. आजच्या सकाळमध्ये संपूर्ण गाभाराच सोन्याच्या पत्र्याने मढवून टाकण्याचा मानस एका भक्ताने व्यक्त केला आहे. मागे एक शेर वाचला होता शाहजहान ने ताजमहाल बनाकर गरिबोंकी मोहब्बत का मजाक उडाया असा काहीतरी अर्थ होता. तसंच काहीतरी आता वाटतंय.

तात्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लेखक राजीव अनंत भिडे यांनी बुधवार, 02/01/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे प्रिय मित्रवर्य, रसिकग्रणी तात्यासाहेब अभ्यंकर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्यांच्या हातून रौशनी, साधना कोळीण, पाटणकर आजोबा यासारखी उत्तमोत्तम व्यक्तिचित्रं या पुढेही लिहिली जावोत हीच शुभेच्छा! आम्हाला ग्रिटींग कार्ड बनवंण्याची कला माहीत नाही. तरी सुद्धा आम्ही तात्याला आवडणार्‍या त्याच्या अनुष्का या बाईचं चित्र इथे डकवून त्याला या रंगीत शुभेच्छा देत आहोत. ही बया तात्याला फ्लाईंग किस देते आहे असं आपण समजू!

नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 01/01/2008 03:01 या दिवशी प्रकाशित केले.

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः

"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे"

"एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला"

"अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!"

जुळल्या सुरेल तारा...

लेखक नंदन यांनी सोमवार, 31/12/2007 08:07 या दिवशी प्रकाशित केले.
'जगाच्या पाठीवर' या चित्रपटातला हा प्रसंग आज अचानक यूट्यूबवर भटकताना सापडला. 'थकले रे नंदलाला' आणि 'बाई मी विकत घेतला श्याम' ही दोन्ही सुरेख गाणी या प्रसंगात आहेत.

तूच नव्याने घडशील काय

लेखक ऋषिकेश यांनी सोमवार, 31/12/2007 07:28 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या वर्षातील नवे तराणे येत्या वर्षी उरतील काय?
गेल्या वर्षी निसटून गेले क्षण नव्याने मिळतील काय?

गेल्या वर्षातील दिवस जे सार्‍यांसाठी झिजलास
स्वत:साठी एक दिवस यावर्षी तरी तू उरशील काय

जगण्यासाठी पळता पळता रोज नव्याने मरतोस
मरण्याआधी जगण्यासाठी मनमोकळे हसशील काय

तिला चोरून बघता बघता रोज मुक्याने वाहतोस
तिला बोलते करण्यासाठी तूच मनीचे गाशील काय

आरशात हे रोज स्वतःला चोरून तू रे पाहतोस
मग गर्दीच्या या डोळ्यांना सांग बरे तू दिसशील काय?

Taxonomy upgrade extras

गाण्यांशी निगडीत आठवणी

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 31/12/2007 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील... ख्वाब हो तुम या कोई हकीकत.. किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.