"महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...."
नमस्कार
सर्वात प्रथम सर्वांना "महाराष्ट्र् दिनाच्या' शुभेच्छा !
चर्चेस कारण असे की 'लोकप्रभा' मधला हा लेख --- "महाराष्ट्र धर्म"
अतिशय संतुलित लेख वाटला. वास्तविक श्री. राजू परुळेकर हे तसे पाहीले तर 'सेना' गटातले पण तरी सुद्धा त्यानी 'शिवसेनेच्या' पदरात तिच्या चुकांचे माप घातले आहे.
सध्याच्या 'राज ठाकरे' कृत आंदोलानामुळे सर्व सामान्यांना नक्की कुठली बाजू घ्यावी हे कळेनासे झाले आहे. एकीकडे 'उत्तर भारतीय दादागिरी हटवा' हे पटते पण त्याच बरोबर 'ती हटवण्याचा' मार्ग तितकासा पटत नाही.
मिसळपाव