कुक्कुटधर्माचा मिसळपावला सक्रीय पाठिंबा
लेखनप्रकार
कुकूचकू मंडळी,
थोडा उशीरच होत आहे. पण हे स्थळ बघून बहुत संतोष जाहला. नुसताच तोंडी निषेध न करता त्या तिथल्या दडपशाहीतून लेखक वाचकांची मुक्तता केल्याबद्दल तात्याबांचे आभार. मिसळपावाच्या रूपाने प्रतिसृष्टीच निर्माण करणार्या तात्याबांना आम्ही समस्त कुक्कुटधर्मीयांच्या वतीने कुक्कुटविश्वामित्र पुरस्कार जाहीर करतो. (अरे हो हो, कुक्कुटमेनकाही लवकरच अवतीर्ण होणार आहेत, पण तात्यांची तपस्या भंग न करता त्यांचे मनोरंजन करायला)
आमचे परममित्र व आद्य कुक्कुटधर्मी म्हणजेच कुक्कुट्महर्षी सर्किटेश्वर हे तर येथे नित्य नियमाने येत आहेतच, पण आम्हीही हे ठासून सांगतो की यापुढे मनोगतावर आमच्या प्रतिभेची ठोक व किरकोळ अंडी देणे आम्ही बंद करत आहोत तर्री वाचकांनी मिसळ्पावाबरोबर आमची भुर्जीही आता येथेच तिखट मानून घ्यावी ही विनंती.
जय कुक्कुट !
वाचने
4441
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चवीत बदल
जय कुक्कुटधर्म! जय मिसळपाव...:)
स्वागत
स्वागत
वात कुक्कुटाचा
येऊ द्यात हो मेनका ऊर्वश्या ......