नायाग्रा चित्रदर्शन
अमेरिकेला जाणार्या भारतियांना सगळ्यात मोठे आकर्षण असते ते नायाग्रा धबधबा बघण्याचे आणि त्यामुळेच कधीही इथे गेले तरी भारतीय लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळते. (ह्याचा फायदा असा की इथे अगदी ढाब्या पासून गाड्यांपर्यंत भारतीय खाण्याची रेलचेल असते. :) ) मागच्या वर्षी ह्याच सुमारास नायाग्राला भेट देऊन आलो होतो. अमेरिका आणि कॅनडा अश्या दोन देशांच्या सिमेवर बसलेला हा प्रचंड धबधबा. व्हिसाच्या कटकटी मूळे त्यावेळेस फक्त अमेरिकेच्या बाजुने जेवढे बघता आले तेवढे बघीतले ह्यावर्षी योगायोगाने बरोबर त्याच सुमारास कॅनडातील टोरांटोला गेल्याने कॅनडाच्या बाजूने हा धबधबा पहायला मिळाले.
मिसळपाव
