चटणी
वेगवेगळ्या ओल्या,सुक्या चटण्यांचे प्रकार ह्या धाग्यात लिहिले तर हव्या त्या चटणी साठी एकत्र कलेक्शन मिळेल.तुम्हाला काय वाटते?
१)शेंगदाणे +तीळ+लसूण चटणी
१ वाटी शेंगदाणे,१/२ वाटी तीळ, १०ते १२ सुक्या लाल मिरच्या,१ मध्यम गड्डी लसूण,मीठ
शेंगदाणे व तीळ वेगवेगळे खमंग भाजणे.गॅस न लावताच लाल मिरच्या दाणे तीळ भाजलेल्या गरम कढल्यात घालून थोड्या परतणे.कढल्याच्या तेवढा गरमपणा पुरतो.
मिक्सर मध्ये तीळ आधी फिरवून घेणे त्यावर दाणे, मग मिरच्या आणि शेवटी लसूण घालणे.
मिसळपाव