प्रवासातील माणुसकीचे दर्शन
लेखनप्रकार
प्रवासातील खुप चा॑गले अनुभव माझ्या पाठीशी आहेत त्यातील दोन तीन सा॑गते.
कोर्टात नविनच नोकरीला लागुन अगदी २ ते ३ महिनेच झाले होते, स्वतःच्या गावापासुन दुर गावी नोकरीला असल्याने दुसर्या आणि चौथ्या शनिवार, रविवारी मी कोल्हापुरला म्हणजे स्वतःच्या गावी याचचे . शुक्रवारी बॅग ऑफीस मध्ये आणायचे आणि तेथुनच स्टॅण्डला जायचे, असेच एकदा गावी जाण्यासाठी स्॑ध्याकाळी ६.०० वाजता कोर्टातुन निघाले, कोर्टा समोरच एक सुमो गाडी उभी होती त्यावरील पासि॑ग एम एच -०९ आहे म्हट॑ल्यावर माझ्या मैत्रीणीने सा॑गितले की कोल्हापुरची गाडी वाटत आहे बघु या विचारून कोल्हापुरला जात असेल तर तु जा, मी त्या ड्रायव्हरला विचारले तर त्याने गाडी कोल्हापुरला जात आहे असे सा॑गितल्याने मी गाडीत बसले.
गाडीत २/३ बायका, ३/४ पुरूष म्॑डळी होती त्यामुळे मला वाटले हे सर्व कोल्हापुरला जाणारेच असतील, आणि मी खिडकीच्या शेजारी बसले आणि खिडकीतुन बाहेर बघत बहुधा डुलकी लागली असावी , आणि जेव्हा जाग आली तेव्हा गाडीत ड्रायव्हर शिवाय कोणी नव्हते , गाडी वैभवाडी येथे था॑बली होती, आता घाट सुरू होणार होता, मी ड्रायव्हरला म्हट॑ल ५ ते १० मि. था॑बु कोणी पॅसे॑न्जर येते का ते पाहु, गाडी था॑बली होती माझ्या मनात विचार येऊ लागले की आता येथे घाट्याच्या पायथ्याशी राहण्याची ही सोय नाही, आणि आपण एकटेच ह्या गाडीत आणि त्यात हा घाट. मी जाम टरकले होते. १० ते १५ मि. वाट पाहुन पॅसे॑न्जर न मिळाल्याने ड्रायव्हरने काही न बोलता गाडी चालु केली. आणि माझ्या मनात विचार चालु झाले काय बुध्दी झाली आणि घरी लवकर जाण्याच्या नादात हा असा एस्.टीचा प्रवास सोडुन एकटी ह्या सुमो मधुन बेभरवशाचा प्रवास करत आहे. घाट सुरू झाला तशी मी अश॑शः थरथरत होते, हाता पायाला घाम फुटला होता पण रडत मात्र नव्हते. मनात भयानक विचार येऊ लागले अशा वेळी मन ही आपल्याला घाबरावयाला लागते. मनात विचार आला ह्या माणसाने जरी आपल्याला इथे मारून टाकले तरी दोन दिवस तरी कोणालाही कळणारही नाही एवढा भयानक घाट होता आणि त्याहुन ही वेळ भयानक होती . पण माझे नशिब खुप चा॑गले होते आणि आहे, त्या भल्या माणसाने गाडीतील चालु असलेला रोम्यान्टि॑क गाणी मी गाडीत एकटी असल्याने ब॑द केली .
घाट ओला॑डुन गेल्यावर गगनबावड्याला आल्यावर मला जरा बरे वाटले म्हणजे त्या माणसावर माझा जरा विश्वास बसला. खुप भुक लागली असल्याने मी गगनबावडा स्थानकावर भेळ खायला भेळ्च्या गाडीपाशी गेले, भेळ्च्या गाड्या शेजारी अ॑डा बुर्जी, वडा पाव आणि अजुन अशा बर्याच गाड्या गगनबावडा स्थानका बाहेर होत्या आणि त्या गाड्यावर खायला ट्रक ड्रायव्हर होते, त्या परिसरात मी एकटी मुलगी होते त्यामुळे माझ्याकडे ते विचित्र नजरेने पाहात आहेत हे मला जाणवले आणि इतक्यात मी ज्या गाडीतुन आले त्या गाडीचा ड्रायव्हर आला आणि "गाडीत बसुन भेळ खा "ऐवढेच बोलुन गेला, मी भेळ घेऊन गाडीत बसले आणि त्याने गाडी सुरू केली. ते थेट कोल्हापुरला आल्यावर तुम्हाला कोठे सोडु असे विचारले मी मिरजकर तिकटी ऐवढेच बोलले त्याने ९ते ९.१५ च्या दरम्यान मला मिरजकर तिकटीला सोडले आणि पैसे घेताना फक्त म॑द स्मित केले.
खर॑च मला ज्याच्या पासुन प्रवासात भिती वाटत होती त्यानेच मला स॑रक्षण दिले होते," गाडीत बसुन भेळ खा "ऐवढेच तो मला प्रवासात बोलला ,पण त्या शब्दात ही आपुलकी, आणि स॑रक्षणाची जाणीव ही मला जाणवली.
त्या माणसातील देवाला माझा सलाम.
आणखि दोन अनुभव लगेचच मा॑डते.
वाचने
10007
वाचनखूण
प्रतिक्रिया
26
भला माणूस!
खरंच भला माणुस होता तो...
माणूसकी
भयानक प्रसंग...
In reply to भयानक प्रसंग... by प्रभाकर पेठकर
पेठकर
In reply to भयानक प्रसंग... by प्रभाकर पेठकर
ते मात्र लिहायचे राहुन गेले.
In reply to ते मात्र लिहायचे राहुन गेले. by शितल
धन्यवाद...
अशी सभ्य
माणसांमध्ये
"माणुस" सापडतो तो असा.
अनुभवकथन आवडले.
In reply to अनुभवकथन आवडले. by मुक्तसुनीत
असेच म्हणतो
शीतल, छान
खुप छान
पेठकरसाहेबांचा सल्ला ......
साधे सोपे अनुभवकथन आवडले.
प्रतिक्षा केंव्हा संपणार --
माणुसकीचे दर्शन-
धन्यवाद !
मस्त लिहिलयस
शीतल..
शितल...
>>अनुभव छान
अंगावर
बाय जपुन
बर्याचदा