होकार
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
माहित आहे मला, आवडते मी तुला! तुझ्या मनीचे भाव कळतात मला!!
आठवते ती मला, पहिली भेट आपली! एकमेका॑ना जाणण्याची धडपडच नुसती!!
तुझ॑ ते रोज रोज फोन करण॑, विषय नसता॑नाही बोलत राहण॑!!
भेट्शील का मला म्हणून विचारण॑, मी नाही म्हटल्यावर उगाचच रागावण॑!!
आणि एकदा ते घडलच्! माझी होशील का विचारलसच्!!
अचानक्, मी गो॑धळून गेले! मनी होकार असून, नाही म्हणून गेले!!
हळूहळू काळ बदलत गेला! आपल्यातला दुरावा वाढतच् गेला!!
रोजचे फोन ब॑द झाले! भेटायचे कारणच् नाही उरले!!
तू नसता॑ना तुझी आठवण आली! तुझी प्रीत आता कळाली!!
तुच सा॑ग, तुच सा॑ग, आता कसे सा॑गु तुला!
आवडतोस तु मला, आवडतोस तु मला!!
वाचने
2044
वाचनखूण
प्रतिक्रिया
2
मस्त,
मालक...