मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रात गयी, बात गयी?

गिरिजा · · कौल

वाचने 1012 वाचनखूण प्रतिक्रिया 4

गिरिजा यांनी शीर्षकामध्ये कौलाचा विषय देताना त्यात दुवाही दिला होता त्यामुळे तांत्रिक बिघाड झाला. सबब, आम्ही शीर्षकातला तो दुवा काढून टाकून येथे देत आहोत. मिपाकरांनी आता हा दुवा वाचावा व मत द्यावे ही विनंती... जनरल डायर. हे वाचा व मत द्या! (निवडीसोबतच मत जरूर लिहा..) --गिरिजा.

प्रभाकर पेठकर Sun, 06/01/2008 - 14:27
सहमत किंवा असहमत असे कुठलेच मत देता येत नाही. परिस्थिती 'इतकी' पुढे गेली असेल असे कधी वाटले नव्हते त्यामुळे त्यावर कधी विचारच केला नाही आणि म्हणूनच झटकन मत बनविता येत नाहिए. 'आर्थिक गरज' एका कडून, 'शारीरिक गरज' दूसर्‍याकडून आणि 'भावनिक गरज' तिसर्‍याकडून ह्यातूनच तर एकतर्फी प्रेमाची, हिंसेची प्रकरणे घडत नसावीत न? असाही विचार मनात येतो. भावना इतक्या अस्थिर असतील तर लग्ना नंतर सहजीवन किती काळ टिकेल? कारण, विवाहोत्तर काळातही जोडीदाराशी सौम्य मतभेद, मध्यम मतभेद आणि तिव्र मतभेद हे होतच राहणार अशा वेळी कुठली विचारसरणी त्यातून दोघांनाही तारुन नेणार? हे कळत नाही. की जरा मतभेद झाले की घे घटस्फोट आणि कर दूसर्‍याशी लग्न किंवा नाही करायचे लग्न, तसेच करीयर जोपासत राहायचे, जेंव्हा जेंव्हा शारीरिक गरज भासेल तेंव्हा तेंव्हा भेटेलच कोणीतरी. 'आर्थिक' गरज कदाचीत भासणार नाही. भावनिक गरज तर कोणीही शमवू शकतो. (खरंच?) म्हातारपण येईल. (विचारात आपण कितीही 'पुढारलो' तरी वय थांबवू शकत नाही. म्हातारपण हे येणारच.) कंबरदुखी, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, कॅन्सर (आजकाल फार कॉमन होत चाललाय), अंधत्व असे अनेक आजार्/व्याधी जेंव्हा शरीरात घर करू लागतील तेंव्हा मायेचे कोण असेल बरोबर? आज तरूण वयामुळे (स्त्री-पुरूष दोघांनाही) 'आर्थिक गरज' एका कडून, 'शारीरिक गरज' दूसर्‍याकडून आणि 'भावनिक गरज' तिसर्‍याकडून भागविण्यासाठी साथीदार, सहानुभूतीदार, 'गरजू' भेटतीलही पण म्हातारपणी कोणी भेटेल? सर्वात मोठा प्रश्न संततीचे काय? की संतती नकोच. आधीच सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम वर्गात 'कुटुंबनियोजना'च्या जाणीवेतून संतती नियमनाद्वारे सुशिक्षित समाज आकुंचन पावत आहे आणि अशिक्षित, अंधश्रद्ध आणि आर्थिकदृष्ट्या अक्षम वर्ग कुटुंबनियोजनाचे महत्त्व न कळून किंवा दुर्लक्ष्य केल्यामुळे २ पेक्षा जास्त मुलांना जन्मास घालत आहे. ह्या सर्वाचा परीणाम अशिक्षित, अक्षम वर्ग वाढून सुशिक्षित समाज 'अल्पसंख्यांक' होत जाईल. राजकारण्यांचे अधिक फावेल. आजच्या काळातही राजकारणी निर्लज्यपणे सांगतात 'आम्हाला तुमची मते नाही मिळाली तरी चालेल झोपडपट्टीतून आम्हाला एकगठ्ठा मते मिळतात.' नविन सुशिक्षित पिढीने संततीच नको असे म्हंटले तर आजची सामाजिक परिस्थिती अजूनही चिघळत जाईल. संतती निर्मिली पण आई-वडीलांचे पटले नाही (कारण दोघांनाही मतस्वातंत्र्य असणार आहे. लग्नसंस्थेकडे बघण्याचा पारंपारीक [म्हणून चुकीचा] दृष्टीकोन बदललेला असेल) दोघेही विभक्त होऊन दोन दिशांना गेले. आता त्या लहानग्यांनी काय करायचे? त्यांच्या आर्थिक, भावनिक गरजा कोण पुरवणार? त्यांच्यावर कोण आणि कुठले संस्कार करणार? सगळाच अंधार. अशी काहीतरी भयानक वाटचाल चालू आहेसे त्या लेखावरून वाटले. कदाचित माझी मते पार टोकाची असतील. मला वाटते तसे काही होणारही नाही. पण ऐहिकतेलाच आदर्श मानणारी पिढी मात्र जन्मास येईल (किंवा कदाचित आलीही असेल) आणि ते समाजाच्या एकसंघीपणास घातक असेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

राजे Sun, 06/01/2008 - 14:33
तुमच्या मताची १००% सहमत. त्यासाठीच तो लेख मी दोनदा वाचला व मनामध्ये प्रचंड गुंतागुंती झाली.. त्याला शब्दबध कसे करावे ह्याचा विचार करत होतो व तुम्ही प्रतिसाद दिला. काहीतरी भयानक वाटचाल चालू आहेसे त्या लेखावरून वाटले. कदाचित माझी मते पार टोकाची असतील. मला वाटते तसे काही होणारही नाही. पण ऐहिकतेलाच आदर्श मानणारी पिढी मात्र जन्मास येईल (किंवा कदाचित आलीही असेल) आणि ते समाजाच्या एकसंघीपणास घातक असेल. अवांतर : येथे हरयाणा मध्ये काही वडीलधारी माणंस असे काहीतरी वाचले/ टीव्हीवर पाहीले की लगेच म्हणतात... जेव्हा १४ वर्षाची मुलगी आजी आजी बनेल तेव्हा ह्या जगाचा अंत झालेला असे... ! वाटचाल त्या दिशेनेच चालू आहे.... राज जैन जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

मराठी_माणूस Mon, 06/02/2008 - 11:38
वाचुन आधि विश्वास बसत नव्हता , असे कसे असु शकेल असे वाटत होते. आणि परस्थिति आपल्या हातात नाहि हे जाणवुन असाह्य वाटु लगले.