मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चटका !

उदय सप्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चटका.....एक विरह कविता..... तुझी साथ असल्यावर मरणातसुध्दा जगल्यासारखं वाटतं ! माझ्या तुझ्यावरील प्रेमाच्या उंचीपुढे मला आभाळही ठेंगणं वाटतं ! प्रेम डोळ्यांतून डोकावतं आणि स्पर्शामधे रेंगाळतं ! नि:शब्द भावांचा हा अनुभव, जणू आपलंच बोलणं गेंगणं वाटतं ! कधीतरी बरस ना सखे माझ्यासाठी, वळवाच्या पावसासारखी ! मला सम्पूर्ण वाचून पण तू थंडच ! जसं "पाण्याने" आगीला "डागणं" वाटतं ! ------------------------------------------------------------------------------------ आपण मला इथेही भेटू शकता : कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/ आणि कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/

वाचने 1901 वाचनखूण प्रतिक्रिया 0