Skip to main content

एप्रिल फळ (९)

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वीचे दुवे http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) h

अपत्य दत्तक योजना : (अति)कच्चा आरंभिक आराखडा

लेखक बेसनलाडू यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ऋणनिर्देशः तात्या अभ्यंकर,विकास यांच्यातील संकेतस्थळाचे उपयोग याविषयीच्या चर्चेनंतर आणि तेथे दिलेल्या माझ्या प्रतिसादातील प्रस्तावित दोन योजनांपैकी अपत्य दत्तक योजनेचा (अति)कच्चा आरंभिक आराखडा येथे टंकित करत आहे. अशा विधायक कार्यासंबंधीची मूळ कल्पना पुढे आणल्याबदल तात्या आणि विकासरावांचे मनःपूर्वक आभार व हार्दिक अभिनंदन.

आकांक्षा पुढती इथे...

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/2474 आजकाल ऑफीसमध्ये मी सर्व प्राण घातक शस्त्रे माझ्यापासून लांब ठेवतो.पेन , पेन्सील, पेपर नाईफ वगैरे.पालक मंडळी भेटायला येतात.त्यांची मुक्ताफळं ऐकल्यानंतर माझ्या मनात आत्मघातकी विचार येऊ नयेत म्हणून. मला एक पालक भेटलेआणि मला म्हणाले " मी माझ्या मुलाला न्युरॉलॉजीस्ट करणार आहे."मी दचकलो.

लेखन -चौर्य आणि पॉझिटीव्ह थिंकींग म्हणजे रे काय......भाऊ?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लासातलं अर्ध पाणी पाहून कुणी म्हणतो ग्लास अर्ध भरलेलं आहे किंवा तेच ग्लास अर्घ रिकामं असं म्हणारे लोकही असतात.पहिल्याचं "पॉझिटीव्ह आणि दुसऱ्याचं निगेटेव्ह थिंकींग"अस सगळे ह्या थिंकींगवर उदाहरण देतात.आणि हे जगजाहिर उदाहरण आहे. आता हेच बघा.एका सदगृहस्थांनी माझ्या ब्लॉगवर जावून त्यांनी माझे बरेचसे पोस्ट वाचले वाचून त्याना खूप आवडले. मला लिहीतात, "मी तुमचा ब्लॉग पाहिला आणि काही पोस्ट वाचले.मी समजून चालतो की ती सर्व आरटीकल्स तुमचीच आहेत.तुम्ही चांगले लिहीता.मला काही आरटीकल्स आवडली.

`यू टर्न'

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी `समाधानाची चव' चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतरही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय... समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार असतील. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो..

नोटापुराण

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 14/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे भैय्या, दुसरी नोट दो. यह नही चलेगी." "चल जायेगी साब, नही चली तो बाद में मुझे वापस कर देना." मुंबईच काय, भारतातील बहुतेक शहरात चालणारा संवाद. कारण काय तर नोट बहुतेक वेळा थोडी फाटलेली असते, किंवा जुनी झालेली असते. आणि काय करणार? आपल्यालाच धास्ती असते की ती नोट जर दुसर्‍या कोणी घेतली नाही तर तेवढ्या रूपयांचा फटका बसायचा. ह्या आणि अशा आणखी इतर प्रकारात आपल्याला नोटांचे हाताळणे का चांगले ठेवावे हे कळते :) काही वर्षांपूर्वी नागपूरात तर पूर्णपणे फाटलेल्या, जीर्ण होत चाललेल्या नोटाही वापरात ठेवल्या होत्या लोकांनी.

चूकीचे ( गझल )

लेखक आनंदा माने यांनी रविवार, 13/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
मी बोललो " हे वाटले चूकीचे " "मी बोललो" हे जाहले चूकीचे होतात कोठे वाद बोलण्याने.. अंदाज मी हे बांधले चूकीचे जे घावले त्याच्यात अर्थ मिळेना मी शोधले ... ते दाखले चूकीचे ओटीत गाथा आज ओतल्या तू रे हाय!! का ?...मी वेचले चूकीचे.. - आनंदा आनंद माने, सोलापूर
Taxonomy upgrade extras

तुझ्याच प्रीतिसाठी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 13/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-इंदीवर) हरवून बसलो मी सर्वस्व माझे तुझ्याच प्रीतिसाठी का सोडीले तुझ्या प्रीतिने मला दारो दारी भटकण्यासाठी आंसवे नयनातली नाही ओघळली विचार मनातले नाही बोलले छपवूनी मनात ते मी फिरतो घुटकर मरण्यासाठी तुझ्याच प्रीतिसाठी झालीस ज्याची राहशी त्याची लख लाख लाभो तुला प्रीतिची थबकट माझी दुःखी चीतेवरी जीवंत जळण्यासाठी तुझ्याच प्रीतिसाठी श्रीकृष्ण सामंत

मंगेश पाडगावकरांचे बेळगावात काव्यवाचन.

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 13/07/2008 या दिवशी प्रकाशित केले.
आज १३जुलै. नामवंत कवयित्री इंदिरा संत यांचा ८वा स्मृतिदिन. संत कुटुंबियांच्यावतीने दरवर्षी या दिवशी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थिनीचा आणि तिच्या शिक्षकांचा सत्कार करण्यात येतो. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र भूषण मंगेश पाडगावकर उपस्थित होते. डोह, कोरडी भिक्षा या पुस्तकांचे लेखक आणि मौजेचे संपादक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमाला लाभली होती. पाडगावकरांच्या सत्कारानंतर त्यांनी त्यांच्या सर्व लोकप्रिय रचना सादर केल्या. ८०व्या वर्षातला त्यांचा उत्साह, तडफ, जोम सर्वानाच चकित करून गेला.