Skip to main content

एक छोटी कविता (तक्रारवजा)

लेखक पांथस्थ यांनी शुक्रवार, 05/09/2008 15:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मुलीने मागील वर्षी केलेली एक कविता. मी जास्त वेळ ऑफिस मधे घालवतो आणि सुट्टिच्या दिवशी खेळायला जातो ह्याची तक्रार आहे इथे -
Taxonomy upgrade extras

खुन्नस

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 05/09/2008 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळ पाव अभिरुची कट्टा पेठकरकांचा कॅमेरा जर्रा अंमळ ऊशीराने क्लिकला त्यामुळे अगोदर काढलेले फोटो अपलोड करु शकलो नव्हतो.ते सगळे फोटो स्वाती राजेश ने खास ईग्लंडाहुन धुवुन पाठवले. मजा करण्यात पुणेकर काही मागे नाहीत हे या फोटो वरुन लक्षात येईलच.

फोटो

लेखक वडा-पाव यांनी शुक्रवार, 05/09/2008 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य प्रकार कदाचित चुकला आसेल तर माफ करा. मला काहि फोटो येट्थे दाखवायचे आहेत, थोडि मदत मिळेल का

नवजात बालकांमधील निद्रानाश

लेखक येडा खवीस यांनी शुक्रवार, 05/09/2008 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, खरोखर एका जरा गंभीर म्हणता येईल अशा विशयावर एक चर्चा आणि मते व सुचना अपेक्षित आहेत. माझा मुलगा दीड महिन्याचा असुन गेले काही दिवस त्याचे झोपेचे शेड्युल पार बिघडले आहे. दिवसा अत्यंत कमी झोप आणि रात्री पुर्णपणे टकटकीत जागा+ रडणे यामुळे आम्ही उभयता त्रस्त आहोत. पोट भरलेले असुनही (फिडींग व्यवस्थित झाल्यावरही) महाशय उगाच( कारण माहित नसल्याने हा शब्द वापरतोय) धाय मोकलुन रडत असतात.

सोन्याचं परिवर्तन

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 05/09/2008 02:29 या दिवशी प्रकाशित केले.
गावात आमच्या घराच्या बाजूला महारवडाची आळ होती.गरिब महार आणि चांभार जातीचे लोक बारिकबारिक धंदे करून आपली गुजराण करीत असत.त्यांची लहान लहान मुलं त्या आळीच्या बाहेर येवून मधल्या एका मोठ्या मैदानात खेळायला येत असत.आम्ही पण त्याच मैदानात क्रिकेट खेळत असूं.बाउंडरीवर बॉल मारला की लहान लहान मुलं बॉल परत फेकायची.अशा तर्‍हेने आमची ह्या मुलांशी दोस्ती झाली होती.सोन्या हा बाबू महाराचा मुलगा. सोन्याची आई कधीकधी बांबूच्या पट्याची काही खेळणी आणि सुपे,रवळ्या टोपल्या सारख्या गोष्टी घेवून दारो दार विकायला जायची.त्यावेळी हा सोन्या तिच्या कंबरेवर बसण्याच्या वयाचा होता.तेव्हा पासून मी त्याला पाहिला होता. त्याच्या

गणपतीचा उत्सव - टिळकांचा अग्रलेख

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 04/09/2008 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आताच लोकसत्ताची इ-आवृत्ती चाळत असताना मला टिळकांनी १८ सप्टेंबर १८९४ रोजी केसरीमध्ये लिहिलेला अग्रलेख वाचायला मिळाला. आपण सर्वांनी तो वाचावा असे वाटल्याने त्याचा इथे दुवा देत आहे. http://www.loksatta.com/daily/20080903/vishesh.htm या लेखात त्यांनी पुण्यातल्या गणपती उत्सवाचे वर्णन केले आहे. तसेच शेवटच्या दिवशीच्या मिरवणूकीचे सुद्धा वर्णन दिसेल. त्यात भक्तीरसाने म्हटलेली पदे वगैरे उल्लेख बघुन गहिवरून आले. भक्तीरस, प्रेमानंद वगैरे शब्द ते वापरतात. ते वर्णन वाचण्यासारखे आहे.

फ्रटेटो(इटालियन ओम्लेट)

लेखक वृषाली यांनी गुरुवार, 04/09/2008 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
फ़्रटेटो (इटालिअन ओम्लेट) साहित्य: ४ अंडी , चीज,सिमला मिरची(लाल,हिरवी,पिवळी), १ कांदा,१ टोमॆटो, लसुन पाकळ्या १/२,काळीमिरी पुड,मीठ,बटर,हिरवी मिरची,तिखट,हर्ब(इटालियन सिजनींग्स). कृती:-------- प्रथम पॅन मध्ये बटर घालुन त्यात कांदा, टोमॆटो ,सिमला मिरची, बारीक चिरलेली लसुन परतुन घ्या.नंतर त्यात हिरवी मिरची घाला.थोडेसे तिखट,काळेमिरी पुड टाका.थोडे मीठ घाला.अंडयामधे चीज टाकुन ते चांगले फ़ेटुन घ्या .हे मिश्रण पॅन मध्ये टाका.वरुन हर्ब भुरभुरा.२ मिनटे झाकण ठेवा.हे परतवु नका.

अचानक छोटेखानी मिपा कट्टा! :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 04/09/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, कालची बाप्पाची सुट्टी संपली आणि आज आम्ही नेहमीप्रमाणे आमच्या रोजच्या कामधंद्यात गर्क होतो. एका अशिलाच्या हापिसात काही कामानिमित्त बैसलो होतो. तेवढ्यात आमचा भ्र ध्वनी किरकिरला, "तात्या, मी बिपिन. बिपिन कार्यकर्ते. आहेस का खपलास रे? तुला भेटायचंय!" अरे वा! कार्यकर्तेसाहेब आम्हाला भेटू इच्छितात याचा आम्हाला लै आणंद (च्यामारी, मा**व त्या शुदलेखनाच्या!) वाटला.