आपण सर्वजण आपआपल्या क्षेत्रात रथी,महारथी,अतिरथी असतो. किंवा तसा समज बाळगतो. माझा समज मि.पा.पैलवानानी दुर केला. बरे झाले. महारथी अर्जुनावर एक वर्ष ब्रुहन्नडा व्हायची पाळी आली होती. नव्या मिलेनियम मध्ये माझ्यावर पण हा प्रसंग आला होता.
घरात गणेशोत्सव मोठ्या आणि मिठ्या प्र्माणाने साजरा होतो. ह्या उत्सवामध्ये रसद पुरवठा आणि उष्ट्याचे निराकरण माझ्याकडे असते. स्वयंपाक प्रमुख माझी बायको(आचारी). बाकी सर्व लगतचा मोठा भाउ. सर्व काही विनातक्र्रार. ह्या पाच दिव॑सात इतर सर्व काम बंद.निखळ आनंदाचे ते पाच दिवस. विसर्जनच्या दिवशी अजुनही थोरा मोठ्यांचे डोळे पाणवतात. असो.
दर्शनाकरिता आलेल्या पाहुण्याची उठ्बस मोठ्या भावाकडे असते. मी त्या भानगडीत पड्त नाही. नवविवाहित आणि नवपालक मंडळी कधी बोकांडी बसतिल ह्याचा नेम नसतो. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर माहिती करिता नवविवाहित पाठ सोड्त नाहित. बायको वैतागते.
त्यावर्षी भावो़जी चे कूठलेतरी चुलत नातलग आपल्या दोन्ही मुलासकट आले होते. साहेब सुटात होते. बाप्पाचे दर्शन ते सुध्हा सुटात. वाय्.झेड असतात पराकोटीचे. जेवायला बसताना त्याच्या सुटाला टांग्णी देताना कळ्ले कि साहेब मोठ्या बँकेत मनिजर आहेत. त्याच्या बोलण्यात एकंदरीत मनी ज्वर दिसतच होता.
दोन मुले सि.बि.एस्.सि मध्ये शिकत आहेत हे क्रमाने न विचारताच कळले. मोठा ११वी मध्ये आय्.आय्.टी करता कोचींग घेत आहे हे अभिमानाने सांगण्यात आले.(दहावी ९४%)
जेवण झाले. गप्पाष्टके सुरु झाली. आणि साहेबाच्या हातात माझे कोकरु सापड्ले. पुढील संवाद असा.
साहेबः काय करतोस
कोकरु: ९वी त आहे.
साहेबः किती % मिळतात.
कोकरु: ६०%
साहेबः तुझे बाबा काउन्सेलर आहेत ना? (इथे कोकराच्या चेहेर्यावर अपराधी पणाची भावना) मी मनातल्या मनात सणस्णीत शिवी हासड्ली. अर्जुनाने पण हासड्ल्या असाव्यात.
साहेबः पुढे काय करणार आहेस?
कोकरु: यु.डी.सी.टी.
१० सेकंदात साहेबाचे हिंस्त्र श्वापद झाले.
पुढील १० मिनिटे त्या साहेबांनी कोकराला त्याची अव्कात्,लायकी आणि त्याचे स्वप्न ह्यामधील तफावत ह्या बद्द्ल समुपदेशन केले. माझ्या कोकराच्या डोळ्यात तरळ्लेले पाणी मला दिसत होते. तो पण मुक भाषेत सुटकेची याचना करत होता. पण काय करणार मी ब्रुहन्नडा झालो होतो. यजमान कर्तव्य निभावायचे होते ना. बर जावयाच्या नातलगाचा अपमान कसा करायचा.तरिसुद्धा आय्.आय्.टी मध्ये कुठ्ल्या शाखेत जाणार आहे असा खोचक प्रष्न विचारुन साहेबाला थांबवायचा क्षिण प्रयत्न केला. पण तो काही थांबेना. बायकोला खुण केली. तिने जेवण वाढ्ले आहे सांगुन कोकराची सुटका केली. गणपती चे घर होता म्हणुन वाचला, ऑफिसात वा इतर कुठे सापड्ला असाता तर कुट्लाच असता.
मी ऐनवेळी मदतीला धावु शकलो नाही म्हणुन कोकरु माझ्याकडे १५ दिवस बोलले नाही. मुलाला श़क्ती हा सिनेमा खुप आवड्तो.
दोन वर्षापुर्वी साहेब एका लग्नात भेट्ला. सूट गायब. उत्सुकता होती म्हणून विचारले मुलांच्या शिक्षणाबद्दल. मोठा कुठ्ल्यातरी अर्धवट इंजिनियरींग कॉलेज मध्ये डोनेशन देउन ए.टी.के.ट्या गोळा करत होता. दुसरा ११ वीत गचकला होता. त्याने प्रतिप्रश्न केला. तुमचा काय करतो. त्याला फेफरं येणार हे माहित सुद्धा सांगावच लागले की कोकरु यु.डी.सि.टी. मध्ये आहे. साहेबाचा चेहेरा बघवला नाही. वाइट वाट्ले. तेंव्हा चतुरंगाची कविता हातात नव्हती.
जाता जाता: यु.डी सी.टी मध्ये जागा मिळायला सि.इ.टी मध्ये कमीत कमी ९२% मार्क लागतात. कोकराच्या यशामधे माझा भाग फार थोडा. हे कबुल करायला मला जराही मानसिक त्रास नाही. अगदी समुपदेशक असलो तरी.
वाचन संख्या
6284
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोकरु
मस्त
ह्म्म..
छान!
लेखन छान
कारण काय असावे?
कार्यकारण
पालकांचे भजे -
In reply to कार्यकारण by विनायक प्रभू
+१ हेच म्हणतो
In reply to पालकांचे भजे - by विसुनाना
अनुभव
भजे
मित्राचा फोन नाही(?)
In reply to भजे by विनायक प्रभू
+१
In reply to मित्राचा फोन नाही(?) by प्रियाली
मुक्त स्वातंत्र्य
In reply to भजे by विनायक प्रभू
प्रियालीसारखंच म्हणतो..
In reply to भजे by विनायक प्रभू
>>मित्र
बरोबर
मला
हम्म
फोन हा
सगळं पटतयं!
लेख व
लेख खूप