पाणीच पाणी चोहीकडे...
आत्ताच म.टा. आणि सकाळ मधे वाचले त्याप्रमाणे नाशिकमध्ये महापूर आला आहे आणि पुण्यासकट महाराष्ट्रात इतरत्रही पावसाच्या पाण्याने पूरसदृश्य परीस्थिती झाली आहे...
काही ठळक माहीती (वास्तवीक सगळेच ठळक आहे पण...)अशी:
- पुराच्या पाण्यामुळे गोदावरीकाठी असलेल्या प्रसिद्ध नारोशंकर मंदिराची घंटा पाण्यात बुडाली आहे. नाशिक शहरातील मधील चैतन्यनगर भागात पाणी शिरल्याने अडकलेल्या रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेने बोटीचा वापर सुरू केला आहे.
- ५०हून जास्त बिल्डिंगाभोवती पाण्याचा वेढा
- गोदावरीमधून सद्यस्थितीत ७५ हजार कयुसेक्स पाणी वाहते आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील चांदोरी, सायखेडा यांच्यासह १२ गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- दरम्यान पुरामुळे हरसूल, त्र्यंबकेश्वर, गिरणारे, नाशिक यांसह सायखेडा,चांदोरी या गावांचा संपर्क तुटलेला आहे.
- खडकवासला धरणातून २२ हजार क्युसेक्स पाणी सोडण्यात येत असल्याने मुठेतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डेक्कन परिसरातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
- वास्तवीक श्रावण (राखी/नारळी) पौर्णिमेनंतर कमी होणारा पाऊस हा अजूनच अतिवृष्टीकडे वळत आहे. याचा संबंध काही प्रमाणात वातावरण बदल/क्लायमेट चेंज शी लावता येऊ शकतो. तसा आहे देखील...
- पाऊस हा कधीतरी जास्त पडतो / पडू शकतो (मग तो पावसाळ्यात असेल अथवा इतर कारणांमुळे इतर वेळेस असेल!) इतके जरी मान्य केले तरी आजच्या या परीस्थितीस जबाबदार कोण आहेत या वर विचार केल्यास वाटते - वाटेल तेथे वाटेल तशा इमारती बांधणारे बिल्डर्स, त्याला परवानगी देणारे सरकार/नोकरदार आणि त्याचा विचार न करता ते घेणारे सामान्य नागरीक...
वाचने
5943
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
क्लायमॅट चेंज
In reply to क्लायमॅट चेंज by भास्कर केन्डे
पर्यावरण बदल
फोटोज
निसर्ग
समयोचित लेख
In reply to समयोचित लेख by धनंजय
काँक्रीटीकरण, जंगलतोड इत्यादी
बिकट आहे परिस्थीती..
पूर का येतो?
नाशिकला महापूर....
भेदभाव
In reply to भेदभाव by मराठी_माणूस
खरे आहे...
नाशिकात पूर..
नाश्कातले पाणी.......