लेखकचौथा कोनाडायांनी मंगळवार, 23/03/2021 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
नविन [ Smart Fan ] घावयाचा आहे, बजेट रु १,५०० ते २,०००
Requirements
Great Cooling Experience
तगडी लाईफ
Good Remote as well Mobile Control
Stylish Looks
लेखकआजीयांनी सोमवार, 22/03/2021 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
ही सत्य घटना आहे. विश्वास ठेवा अगर ठेवू नका असं म्हणत नाही. विश्वास ठेवाच.
त्यावेळी मी एका निमशहरात नोकरी करत होते. त्यावेळी मी आणि माझी एक मैत्रीण रोज पहाटे चांगलं चार, पाच किलोमीटर फिरुन यायचो. व्यायाम म्हणून. पहाटे पाच वाजता जायचो आणि सव्वासहा साडेसहा वाजता परत यायचो. दोघींची वयं पस्तिशीची. घरात नवरा, मुलं.
एकदा अशीच मी रात्री झोपले. गाढ झोप लागली. नेहमीप्रमाणे अलार्मशिवाय जाग आली. सवयच पडलेली. बाथरुमला जाऊन आले. एक चुकार कावळा ओरडत होता. परत जरा लोळावं वाटलं, पण निग्रहाने मोह टाळला. म्हटलं, उगीच थोडक्या आळसापायी फिरण्याचा नेम मोडायला नको. पटकन उठून फिरुन येऊया. उठले. दात घासले.
लेखकमुक्त विहारियांनी रविवार, 21/03/2021 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा, अस्मितेसाठीच काढला आहे...धागा अराजकीय आहे... मराठी भाषा, हवी तशी वळवता येत असल्याने आणि एकाच नाण्याला असंख्य बाजू असल्याने, खूप गहनविचार न करणेच उत्तम...
खूप दिवसांनी, ठाण्याला, बहिणीकडे भाऊबीजेसाठी, सगळी भावंडे जमलो होतो. मामलतदाराची मिसळ, सकाळीच खाल्ली होती.
तशी मला ही मिसळ अजिबात आवडत नाही. म्हणजे, आधी आवडत होती पण, सध्या घरीच, खिमामिसळ बनवत असल्याने, आता ही शाकाहारी मिसळ खावीशी वाटत नाही. एकदा प्रयोग म्हणून, कोळंबीमिसळ पण बनवून बघीतली, पण, खिमामिसळ ती खिमामिसळच...
आता संध्याकाळी काय खायचे?
लेखकबिपीन सुरेश सांगळेयांनी शनिवार, 20/03/2021 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
----------------------------------------------------------------------------------------------------------
पैशाचा पाऊस
--------------------------------------------------------------------------------------------------------------
विऱ्याने समोर नाचणाऱ्या पोरींवर नोटा उधळल्या .
जणू पैशाचा पाऊसच !
पोरी जाम खुश. त्यांना माहिती होतं गिऱ्हाईक येडं झालंय म्हणून .
रात्रीची वेळ होती. पनवेलच्या त्या डान्सबारमध्ये रात्र रंगात आली होती. त्याचबरोबर जवानी आणि नशासुद्धा ! बार बराच मोठा होता. मध्ये डान्सफ्लोअर होता. चारी बाजूंनी गिऱ्हाईकं बसली होती. तर्राट झालेली.
लेखकराजा वळसंगकरयांनी शनिवार, 20/03/2021 19:08 या दिवशी प्रकाशित केले.
गोष्ट सांगा आणि गणित शिकवा... 5
नेहा, चिंट्या सायली तिघे ही चक्रावले... सॅमीने त्याचा खुर्चीच्या मागे, त्याला न दिसणाऱ्या दिव्याचा रंग कसा ओळखला असेल? कॅप्टन नेमोंच्या उत्तरात काय क्लु होता? काय दिसले असेल त्यांना?
**************************
गोष्टीचा आधीचा भाग .... इथे टिचकी मारा
**************************
"4 दिवे" – कानात "विचार" कुजबुजली. मग 5वा, त्यांचा खुर्चीच्या मागे लागलेला दिवा कुठला?
लेखकगणेशायांनी शनिवार, 20/03/2021 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
शेअर मार्केट आणि माझा वर्षापुर्वी तसा काही संबंध नव्हता.. आज Share market मध्ये आलेल्यास १ वर्ष पुर्ण होत आहे.
गेल्या एक वर्षभर जो अभ्यास केला त्यावरुन हि लेखमाला सुरु करत आहे. मी तसा काही कॉमर्स किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला नाहिये, पण mathematics & statistics हे माझे आवडते विषय होते. त्याचा शेअर मार्केट मध्ये खुप फायदा झाला. विशेषता Technical भ्यासा मध्ये .आणि या १ वर्षात १.५ लाखाचे ४ लाख करण्यात मी यशस्वी झालो. ते ही Intraday आणि future - Options न करता.
--
शेअर मार्केट हा तसा risky प्रकार समजला जातो..
लेखकज्योति अळवणीयांनी शुक्रवार, 19/03/2021 12:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीत्वाचा सन्मान
नका होऊ नतमस्तक
मी कोणी देवता नाही..
नका म्हणू अष्टभुजा;
मी काली-भवानी नाही!
कधी मखरात... कधी वेश्यागारात...
मान मात्र कधीच नाही!
मनुष्य जन्म माझा ही;
एवढंच स्वीकारणं का शक्य नाही?
जग तुझ्या मनासारखं...
तुला कोणतंही बंधन नाही!
एकदा तिला हे सांगून तर बघा...
अवकाशला गवसणी घालणं खरंच अशक्य नाही!!!