एक कविता
येणार आज म्हणूनी, डंका पिटून गेले
ते मेघ पावसाळी चोरून अंग गेले.
चकवे दहा दिशांचे उसने हसून गेले
वेळूत रानवारे फुंकून दंभ गेले.
दिनरात वंचनेचे पेले भरून प्याले
हिरवे पडाव त्यांचे करपून खाक झाले.
कमळात सावल्यांच्या अडकून भृंग झाले
कित्येक रामदासी कुळवंत रंक झाले.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव