मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपासाचा डोसा मराठीप्रेमी

अज्ञात · · पाककृती
वाढणी: ३-४ जण पाककृतीला लागणारा वेळ: १५ मिनिटे पाककृतीचे जिन्नस भगर - ३ लहान वाट्या, साबुदाणा - १ लहान वाटी भरून चवीपुरते मीठ चटणीसाठी- ओले खोबरे (१ वाटी खवून), मिरची-१, मूठभर निवडलेली कोथिंबीर १" आले, चवीपुरती साखर, लिंबू, मीठ भाजीसाठी -३ बटाटे उकडून, चमचाभर दाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून तूप/तेल, क्रमवार मार्गदर्शन: रात्री वरई (भगर) व साबुदाणा नीट धुवून वेगवेगळे भिजत टाकावे. दुसरे दिवशी सकाळी ते बारीक वाटून घेवून एकत्र करावे. चवीनुसार मीठ घालून ३ तास झाकून ठेवावे. डोसे करतेवेळी नॉन्स्टिक तव्यावर वाटीने फिरवून दोसे घालावेत. अमूल बटर, हिरवी चटणी व सुक्या बटाट्याच्या उपवास भाजीबरोबर गरम गरम सर्व्ह करावेत. अधिक टीपा: नेहमी तीच ती खिचडी खाऊन कंटाळा येतो. (काकडीचा कीस, मिरची-कोथिंबीर पेरून, जाडसर उत्तपेही घालता येतील!)

वाचने 5389 वाचनखूण प्रतिक्रिया 3

स्नेहश्री 09/07/2008 - 15:45
आता आषाढीला करुन बघयल हरकत नाही . --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

प्राजु 10/07/2008 - 01:11
एकदम भारिच की! करून पाहीन नक्की. आवांतर : नाहीतरी आजकाल पित्ताचा त्रास होतो त्यामुळे मनसोक्त खिचडी खाता येत नाहीच... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/