Skip to main content

`स्टार माझा`वर `ब्लॉग माझा'

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 13/11/2008 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, `स्टार माझा'नं घेतलेल्या `ब्लॉग' स्पर्धेत आपल्या काही सदस्यांसह अन्य काही जणांना बक्षीसं मिळाली. पुरस्कार प्रदान कार्यक्रम गेल्या सोमवारी मुंबईत झाला. गेल्या शनिवारी हा कार्यक्रम `स्टार माझा'वरून प्रसारितही झाला. ज्यांना तो पाहायला मिळाला नाही, त्यांच्यासाठी उद्या, शुक्रवार १४ नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता तो पुन्हा पाहण्याची संधी आहे. नक्की बघा! हा कार्यक्रम `स्टार माझा`च्या साईटवर मुखप्रुष्ठावरील आयपी टीव्हीवरही त्याच वेळी ऑनलाइन पाहता येईल.

माझा काऊ.. :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/11/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा.. माझी माऊ :) माऊवरून प्रेरणा घेऊन आम्हीही एक काऊ पाळला आहे त्याची चित्रे इथे टाकत आहोत... काय? एकदम स्मार्ट दिसतो की नाही आमचा काऊ? :) तर सादर करत आहोत आमचा काऊ. आज आमचा काऊ तुमच्याशी थोडा संवादही साधणार आहे! :) १) मी आहे तात्याचा काऊ! त्याच्यासारखाच अंमळ वेडझवा! :) २) साला, हा मराठी माणूस आंतरजालावरही जास्त करून भांडतांनच दिसतो!

निरगाठी...

लेखक नीधप यांनी गुरुवार, 13/11/2008 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
तिने ठरवलंच होतं अंगाखांद्यावर खेळणारा झुरमुर अनुभवांचा गुंताडा, एकदा सोडवायचाच... ती मनाशीच घाबरली. अनुभव दुखावतील वितळून जातील ना.. तसं आवडत होतंच तिलाही अनुभवांच्या झुरमुरीत हरवून जाणं हरवतानाच तिला भान आलं गाठ घट्ट बसत चाललीये. ती थरकापली.. शेवटी काही निरगाठी कापून काढाव्या लागल्या जगण्यापासून.. झुरमुर अनुभव आठवणी झाले. निरगाठींचे चरे मात्र देहामनावर उरले... -नी http://saaneedhapa.googlepages.com/home
Taxonomy upgrade extras

देशद्रोही

लेखक नि३ यांनी गुरुवार, 13/11/2008 06:33 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ..भोजपुरी नट कमाल खान याचा देशद्रोही या चित्रपटावर महाराष्ट्रा सरकार ने २ महीन्यांकरीता बंदी आणली आहे. मुंबई च्या सिनीयर पोलीस ऑफीसर्स नी त्यांच्याकरीता खास आयोजीत केलेल्या शो मधे हा चित्रपट बघुन त्यांचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला पाठवीला होता . त्या रिपोर्ट नुसार जर सध्याच्या परीस्थीतीत जर हा चित्रपट रिलीज झाला तर कायदा आणी सुव्यवस्थे ची पुर्णपणे वाट लागणार. तिकडे ह्या चित्रपटावरील बंदीमुळे प्रोड्युसर आणी नट कमाल खान ह्याने कोर्टाकडे धाव घेतली आहे.

problem

लेखक टारझन यांनी गुरुवार, 13/11/2008 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
Hello All , Since MIPA has recovered from Danial of Service attack , I am not able to access the site smoothly. Its like there is a session of 30 seconds , I cant open a page, I can keep accessing for 30 seconds. After that, If I send the request to the host, It just get lost, and I see a blank page , again If I try after 3 to 5 minutes I can see the page. Again in 30 seconds I dont get response. I am not able to give any reply properly. I thought Is the problem for my region only ? Coz I faced same problem from Office as well as from my hotel where as my service providers are different.

माय मराठी

लेखक veebee009 यांनी गुरुवार, 13/11/2008 01:18 या दिवशी प्रकाशित केले.
इथेच तर अड़ते ना गाडे... पुन्हा एकदा पाहिले ५५ पाढे... विकास नक्कीच पाहिजे झाला... पण त्यात ही हवा नम्बर पहिला... बाकीच्यांचे नंतर बघू... आधी आपल्याच जातीच्या मागे लागू.. समाज म्हणजे आपली जात... जीने केलीय "समाजावर च " मात... प्रत्येकाने असाच विचार करावा, आपला वेगला गट असावा... "आमच्या" भाकरीत "त्यांचा" थोदासाही वाटा नसावा... अरे बंद करा रे गटबाजी ही समाजाची आता जान हवी.. करा प्रतिद्न्या काम करेन मी.. माय मराठी समृद्ध व्हावी..
Taxonomy upgrade extras

"किती सुंदर दिसतात हे फुलांचे ताटवे!"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 12/11/2008 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
मी पालघरला पहिल्यांदाच गेलो.माझा मित्र पावलु फर्नांडीस माझ्या नेहमी मागे लागायचा,की एकदा तरी ये आमच्या घरी.पावलु मुळचा वसईचा.वसईला एव्हडी वस्ति वाढायाला लागली की त्याने तिथून स्थलांतर करायचं ठरवलं.त्याचे मामा आजी वगैरे मंडळी पालघरला रहायचे.पावलू ने तिथे एक छोटसं एक-मजली घर बांधलं.वसईची जागा आणि शेतीवाडी विकून त्याला बराच पैसा मिळाला.

कवच कुंडले

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 12/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
ड्ब्ल्यु.एच्.ओ. मधला कामाचा ३ रा दिवस. एकंदरीत कामाचे स्वरुप फारसे कळले नव्हते. टीम मीटींग ला बोलावणे आले. व्यासपिठावर दिग्गज मंड्ळी बसली होती. साहेब आल्यावर सगळी उठून उभी राहिली. आम्ही पण सलामी दिली. त्यांनी "टेक युवर सिट" म्हट्ल्यावर बसलो बापडे. हे स्पेशल ऑफिसर टू गवरमेंट ऑफ इंडिया फॅमिली प्लॅनिंग होते.पहिल्याच वाक्यात आमची दाणादाण उडाली. एकंदरीत आपला साहेब सोलकर आहे हे लगेच समजले. त्यांच्या भाषणाचा साधारण गोषवारा खालीलप्रमाणे: If anyone of you is a pancy foot quit today. There is no room for weaklings here. You have joined worst possible profession for living. So quit today.

स्फोटात फाटलेले डबे

लेखक ग्रीष्म यांनी बुधवार, 12/11/2008 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
स्फोटात फाटलेले डबे बदलले जातील उद्या कदाचित..... रक्ताचे ते थेंब... मासांचे ते तुकडे .... अन घाबरलेले ते रुळ बदलले जटिल उद्या कदाचित ... मानसं कोम्बुनं घेतील स्वताला पुन्हा त्याच डब्यात उद्या कदाचित ... दारावर सुरु असेल मारामारी आत चिंता चौथ्या सिट साठी ...उद्या कदाचित पुन्हा दादर महिम जोगेश्वरी बोरीवली अन मिरारोड़सगळी स्टेशन पुन्हा उभी असतील रांगेत उद्या कदाचित ....
Taxonomy upgrade extras

पाण्याच्या थेंबासाठी

लेखक सुवर्णमयी यांनी बुधवार, 12/11/2008 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
पाणी वाया घालवू नका असे मुलांवर ओरडतांना आठवत असते मी..माझ्यातल्या एका मुलीला.. आज नळ आला नाही .. .. दोन हातात बादल्या धरून मोठ्या बंगल्याला वळसा घालून शेजार्‍याच्या मालकीच्या विहिरीवर पाण्यासाठी जाणार्‍या.. लहान भाऊ तेव्हा अनेक प्रश्न विचारून भंडावत असे मला.. तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव आतल्या आत ओढायची.. ओढलेला चेहरा हासरा ठेवण्याच्या प्रयत्नात फ्रॉकवर सांडलेल्या पाण्याचे भान यायच ...जेव्हा मीच बघायचे माझ्याकडे तिर्‍हाइताच्या नजरेने.. विहिरीच्या दगडी काठाला आपटत आ
Taxonomy upgrade extras