Skip to main content

जायचे होते कुठे पण...

लेखक शंकर पु. देव यांनी बुधवार, 20/08/2008 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
जायचे होते कुठे पण... गाव भलते लागले वाडवडिलांच्या घरावर नाव भलते लागले ॥ बाग ती गेली कुठे हे निवडुंग नुसते वाढले लावलेल्या त्या मुळावर घाव भलते लागले ॥ १ ॥ देवळाच्या दीपमाळा विकुनी कोणी टाकल्या आणि कळसालाही आता भाव भलते लागले ॥ २ ॥ गाव हे झाले जुगारी सर्व नाती संपली रोज या मातीत आता डाव भलते लागले ॥ ३ ॥
लेखनविषय:

वाचने 1448
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कविता ठीक वाटली.. शुभेच्छा... तात्या.