Skip to main content

"शब्दांवाचून कळले सारे"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 16/11/2008 22:29 या दिवशी प्रकाशित केले.
मी तळ्यावर पुस्तक वाचत प्रो.देसायांची वाट बघत बसलो होतो तेव्हड्यात एक व्यक्ति माझ्या जवळ येऊन हंसली.मी पण त्याच्याशी हंसलो.इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर माला कळलं ही व्यक्ति भाऊसाहेबाना पण ओळखते.त्याच्या बरोबर एक मोठा सफेद रंगाचा कुत्रा होता.तो सतत वळवळ करत होता. मी म्हणालो, "तो तुम्हाला घरी जावूया म्हणून सांगतोय." त्यावर ते गृहस्थ मला म्हणाले, "नाही नाही प्रो.देसाई समोरून येत आहेत ते त्याने लांबून पाहिलंय.त्याना तो चांगलाच ओळखतो.भाऊसाहेब पण त्याच्यावर खूप प्रेम करतात.प्रोफेसर जेव्हा जवळ आले तेव्हा तो जास्तच चूळबूळ करू लागला. भाऊसाहेब जवळ आल्यावर म्हणाले, "ह्या मोत्याच्या मागे गंमतीदार इति

वाढदिवस

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 16/11/2008 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
२० वा वाढदिवस कधीच विसरु शकणार नाही. बरेच काही झाले होते त्या आठ्वड्यात. कुटंब नियोजन कार्यात झोकुन देउन १ वर्ष झाले होते. नावमागे डॉक्टर हि उपाधी लागलेली होती. सर्व टीम मधे अनडीसप्युटेड लीडर झालो होतो. पगार मजबुत. सुट्टी फक्त रविवार ३ ते१०. ह्या सुट्टीच्या वेळात छबिलदास नाहीतर शिवाजी नाट्यमंदिर,ग्रेट् पंजाब, आणि दुर्गाश्रम हा कार्यक्रम असायचा.एकंदरीत करिअर मार्गाला लागले होते. मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार - ह्या ओळी मला अजिबात पटत नाहीत. कितीही वेडा असला तरी कुंभारसाहेब सर्वांना त्यांच्या कर्मानुसार लोणी, व अंगार देत असावेत.

पण मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला आवडेल म्हणुन हा खट्याटोप...

लेखक उम्मि यांनी रविवार, 16/11/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित हि गोष्ट तुम्ही कुठेतरी, कधितरी ऐकली असेल, तुर्तास तरि ती वाचुया ....उ म्मिच्या स्टाइलमध्ये.... मिपाच्या वाचकान्चे यावर मत घ्यायला मला नक्कीच आवडेल, गोष्ट सुरु....................................... एकदा एक मनिमाऊ आपल्या उन्दिरमामान्च्या मागे लागते. पाठलाग सुरु होतो, उन्दिरमामा पुढे, मनिमाऊ मागे..... मनिमाऊ मागे.....उन्दिरमामा पुढे, उन्दिरमामा पुढे.....मनिमाऊ मागे, उन्दिरमामा चलाख असल्याने मनिमाऊच्या तावडित सापडत नव्हता.

उमेदवार आरोपी की आरोपी उमेदवार.

लेखक टवाळचिखलू यांनी रविवार, 16/11/2008 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आताच बातमी ऐकली की, धुळे दंगलीतील प्रमुख आरोपीनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेत. तेही न्यायालयीन कोठडीत असताना. उमेदवारी अर्ज भरताना काही नियम असतात की नाही ? हा प्रश्न मला पडलाय कुणी उत्तर शोधण्यास मदत करेल का? मतदान करणार्याना आता सगळ्यात जास्त गुन्हे करणार्यास निवडुन द्यावे लागेल. ( हा विनोद म्हनावा की ....?) ---- संतप्त चिखलू

पहिली रात (धुवांधार द्वंद्व)

लेखक केशवटुकार यांनी रविवार, 16/11/2008 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
देवद्वार छंदात कविता करणार्‍या कवींची लाट पाहुन केशवटुकाराला जाग आली अन त्याला आठवली त्याच्या प्रातःस्मरणीय सदगुरु केशवसुमारांनी दिलेली धुवांधार द्वंद्वाची दिक्षा.

मराठी-हिंदी वाद-एक नवा पैलु

लेखक वेताळ यांनी रविवार, 16/11/2008 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
नवभारत टाईम्स मधील एल लेख खाली देत आहे. http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/3684066.cms सर्वानी वाचवा अशी विनंती.प्रतिक्रिया आवश्य द्या. वेताळ

पहिली रात (देवद्वार)

लेखक रामजी यांनी रविवार, 16/11/2008 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र चांदण्यांची । शाल पाघरली । रात ही पहिली । आली सखे ॥ धुंद त्या क्षणांची । पाहतो मी वाट । झेलुया गं लाट । आवेगाची ॥ मनीचा मोगरा । आज बहरेल । श्वास हा भेटेल । श्वासाला गं ॥ रात ही सरेल । देह दुरावेल । मन रेंगाळेल । तुझ्यापाशी ॥

अर्थ सान्गाल का?

लेखक नील_गंधार यांनी रविवार, 16/11/2008 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मला काहि मराठि शब्द आडले आहेत.त्यांचा नक्कि अर्थ कोणी सांगु शकेल काय? १. सर्जनशीलता कि स्रुजनशीलता ? ह्यातला नक्की कोणता शब्द बरोबर आहे? व त्याचा अर्थ काय? २. "अभिजात" ह्या शब्दाचा नक्की अर्थ काय? गंधार