मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'बिग बॉस' आणि तुमचं मत !

संदीप चित्रे · · काथ्याकूट
ही बातमी वाचलीत ? 'बिग बॉस' ह्या रिऍलिटी शोच्या दुसर्‍या भागात आपल्याला सहभागी होण्यासाठी बोलावूनही जातीच्या आधारावर आपल्याला वगळण्यात आले आहे / डावलण्यात आले आहे अशी तक्रार खा. आठवले ह्यांनी केली आहे ? मिपावरची संवेदनशील चर्चा वाचून उत्सुकता वाटली की इथल्या माझ्या मित्र / मैत्रिणींना ह्या बातमीबद्दल काय वाटतं पहावं. जर जातीच्या आधारावर रिझर्व्हेशन, बढतीमधे प्रेफरन्स इ. गोष्टींचा लाभ उठवणं वावगं नसेल तर जातीच्याच आधारावर डावलले गेल्यास तक्रार करणे योग्य आहे का ? (इथे क्षणभर असे गृहित धरले आहे की त्या चॅनेलने खरच 'जात' हा निकष वापरून आठवलेंन वगळले आहे !) तुम्हाला काय वाटते ?

वाचने 4161 वाचनखूण प्रतिक्रिया 14

मुक्तसुनीत 22/08/2008 - 02:19
त्याचा एक एपिसोड गेल्या वर्षी पाहिला होता. भीषण कंटाळवाणा , उथळ लोकांनी , केवळ गॉसिपिंग करता केलेला प्रकार. ना त्यात कला , ना त्यात मनोरंजन. फालतू अतएव अव्हॉईड मारणेबल ! =))

विसोबा खेचर 22/08/2008 - 06:53
तुम्हाला काय वाटते ? आधी बोलावून नंतर डावललं ही चूकच आहे! तात्या.

मराठी_माणूस 22/08/2008 - 13:45
थिल्लर कार्यक्रमात घेतले नाहि म्हणुन रडायचे हे खासदार असलेल्या माणसाल शोभत नाहि. उलटे ह्यानि , मला असल्या कार्यक्रमाला यायला फालतु वेळ नाहि हे सांगायला पाहिजे होते. लोकानि त्याना ह्या कारणासठि निवडुन दिले का समाजाचे प्रश्न सोडवयला ?

पक्या 22/08/2008 - 13:48
रिऐलिटी शो वाले टीआरपी वाढवण्यासाठी अनेक ड्रामा करतात जे पडद्यावर बघताना दर्शकांना खरेच वाटतात. ड्रामा म्हणजे सर्व काही आधी ठरलेले असते..कोणी काय बोलायचे, जज्ज ने कधी भांडायचे , कधी जोक्स करायचे...याचे पूर्ण स्क्रिप्ट तयार असते. पण तरीही जातीच्या आधारावर डावलणे हे चूकच. आणि त्यातही आधी बोलावून नंतर फक्त जातीच्या आधारावर डावलणे ही चूकच!

भडकमकर मास्तर 22/08/2008 - 14:12
थिल्लर कार्यक्रमात घेतले नाहि म्हणुन रडायचे हे खासदार असलेल्या माणसाल शोभत नाहि. कोणी काय बोलायचे, जज्ज ने कधी भांडायचे , कधी जोक्स करायचे...याचे पूर्ण स्क्रिप्ट तयार असते. सहमत... पण जातीच्या आधारावर डावलायचे असते तर आधी विचारले कशाला असते ? काहीतरी वेगळे कारण असणार... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

विदुषक 22/08/2008 - 14:51
आपण दिलेल्या कराच्या पैश्यातुन ह्या चोर लोकाना (खासदार) भत्ते मिलतात आणी हे ३ महीने त्या 'बिग बॉस' च्या घरात जाउन १ कोटी रुपये कमवणार ह्या लोकनाच मारायला पहीजे मजेदार विदुषक

In reply to by विदुषक

भास्कर केन्डे 22/08/2008 - 20:18
आणि या तीन महिन्यात जनतेची सेवा करा म्हणावे. आंबेडकरांचा वारसा सांगणर्‍यांना या भामट्यांना तीन महिने त्यांच्या सारखे सेवाभावाने जगून दाखवा म्हणावे! आपला, () भास्कर आम्ही येथे वसतो.

प्रभाकर पेठकर 22/08/2008 - 15:04
अमीरखानचा भाऊ फैझलखानलाही डावलले आहे अशी बातमी आहे. त्याला अमीरखानच्या सांगण्यावरून डावलले असा त्याचा आरोप आहे. तो कोर्टात जाणार आहे. मला आशा आहे 'राखी सावंत' पुन्हा येईल.

भडकमकर मास्तर 22/08/2008 - 15:14
पण या वेळी एक से एक लोक जमवले आहेत, हे बाकी खरे.... ... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

राधा 22/08/2008 - 20:04
सगले पब्लिसीटी स्टंट्.................नको तिथे ओरडल की लोकांचा लक्ष जाणारच ............. थिल्लर कार्यक्रमात घेतले नाहि म्हणुन रडायचे हे खासदार असलेल्या माणसाल शोभत नाहि. उलटे ह्यानि , मला असल्या कार्यक्रमाला यायला फालतु वेळ नाहि हे सांगायला पाहिजे होते. लोकानि त्याना ह्या कारणासठि निवडुन दिले का समाजाचे प्रश्न सोडवयला हेच माझाही मत आहे..........

बाबा चमत्कार 22/08/2008 - 20:23
अहो ही सगळी वेळ घालवण्या चि साधने आहेत. काहि तरी म्हने एकत्र रहा आनि आप्ण त्याना बघा....कुनाला वेळ आहे दुस्र्यान्च्या नकलि जीवनात डोके घालायला?

देवदत्त 22/08/2008 - 21:54
ही ही ही ... म्हणजे एखाद्या खासदाराला किंवा लोकांच्या नेत्याला अशा कार्यक्रमात बोलावले म्हणजे त्याला जिंकवावेच लागेल. अन्यथा शेवटच्या २ पर्यंत तो पोहोचला आणि हरला तरी तेच म्हणणार 'मला डावलले गेले'.