Skip to main content

ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/11/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला, "साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील." मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर, गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्याआवाजात मला "जय महारष्ट्र" म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभ

माशांची आमटी

लेखक शोनू यांनी मंगळवार, 25/11/2008 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
माशांच्या आमटीचा अगदी साधा प्रकार साहित्य १-२ पापलेट, ( २-३ बांगडे, किंवा सुरमईचे १०-१२ तुकडे ) वाटीभर कोलंबी ऐच्छिक एक वाटी ओलं खोबरं ७-८ ब्याडगी मिरच्या १ टेस्पून धणे, अर्धा टी स्पून हळद मीठ, छोट्या सुपारीएवढी चिंच एक छोटा कांदा ,एक इंच आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या - तिन्ही अगदी बारीक चिरून . २ चमचे तेल ( खोबरेल चालत असेल तर ते, नाहीतर शेंगांचे किंवा कनोला . तिळाचे, ऑलिव्हचे वापरु नये ) माशांचे तुकडे करूनच आणावेत. घरी आणल्यावर थंड पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत.

हि कार!

लेखक केसुरंगा यांनी मंगळवार, 25/11/2008 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींची 'शिकार!' बघून आमची कार आम्हाला आठवली नसती तरच नवल! ;) ....................................... हि कार! ............................................... उन्हात या कोवळ्या सकाळीच धार येते नि संपता संपता बघा ही दुपार येते! कधी तरी भेटती जुने मित्र सांजवेळी... नशेत होतात छान गप्पा...

आर्थिक संकट आणि बचत.

लेखक रामशास्त्री यांनी मंगळवार, 25/11/2008 02:06 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संस्कृतीने आणि संस्कारांनी लहानपणापासूनच बचतीचे महत्व आपल्या मनावर बिंबवले आहे. विविध सणांच्या निमित्ताने आपण जनावरांची, यंत्रसामुग्रीची, हिशेबाच्या वह्यांची पूजा करत असतो. खरी पूजा म्हणजे केवळ पोकळ विधी नव्हेत. एखाद्या रिक्षावाल्याने नुसता रिक्षाला हार घालणे पुरेसे नाही. त्या आपल्या उपजीविकेच्या साधनाचे महत्व समजून घेऊन त्याने आपल्या रिक्षाची नीट निगा राखायला हवी. सणवार एकवेळ सोडून देऊ, पण आपले संस्कारही हेच सांगतात. लहानपणी ताटात अन्न शिल्लक ठेवले म्हणून अनेकांनी मार खाल्ला असेल.

कोळंबी-शेवगा-कैरीची आमटि (१८ छायाचित्रांसह)

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 25/11/2008 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, 'कोळंबी-शेवगा-कैरीची आमटि' हि दोन पुर्वप्रकाशित पा.कृं.ची ( ललिता - 'कोलंबीची आमटी' आणि लवंगी - 'कांदा-कोलंबी-कैरीच कालवण') सरमिसळ करुन उदयास आलेली एक नव पा.कृ. आहे. ह्या पा.कृ. चे श्रेय मुळ पा.कृं.च्या लेखिकांना समर्पित आहे. १.

अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती

लेखक mina यांनी सोमवार, 24/11/2008 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
मला विचार आवडले म्हणुन मिपावर देत आहे.आपल्या काय वाटते लेखिका जे.के.रोलिंगच्या विचारांबाबत?माझ्या ब्लागवर हे विचार वाचकांना प्रेरणा देणारे ठरले आहेत.
'हॅरी पॅटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे.के.रोलिंग यांनी जगविख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात 'अपयशाच्या'फायद्यावर प्रकाशझोत टाकुन विद्यार्थ्यांना एक नवा कानमंत्र दिला..हा कानमंत्र प्रत्येकासाठी बहुमोल ठरणारा आहे.म्हणून तुम्हा सर्वांसाठी त्या भाषणाचे थोडक्यात ठळक मुद्दे देत आहे.पदवी घेतल्यानंतर लेखिकेचे सात वर्षे ही महाप्रचंड अपयशाची होती..त्याबाबत सांगतांना त्या

--- ओढ वादळी ...(सवंगलता छंद) ---

लेखक केशवटुकार यांनी सोमवार, 24/11/2008 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
काल प्रातःस्मरणीय नित्यवंदनीय गुरुवर्य केशवसुमार स्वप्नात आले, म्हणाले "आंद्या शिंच्या अरे झोपतोस काय ? उठ भाड्या .. मोठ्या विश्वासाने तुमच्या खांद्यावर काही जबाबदारी टाकली होती .. तुम्ही पार चिंध्या केल्या रे विश्वासाच्या !!" ... गुरुवर्याचा क्रोधित स्वर ऐकुन अंमळ घाबरलोच .. गुरुबंधु रंगारावाला फोन लावावा म्हटला तर गुरुदेव कडाडले .. "थांब जरा !! .. आज आलोच आहे तर हा द्वंद .. सॉरी छंद शिकुन घे !" .. त्यांनी शिकवला तो सुरेख असा "सवंगलता छंद" ...

ओढ वादळी ...(लवंगलता छंद)

लेखक मनीषा यांनी सोमवार, 24/11/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
नको मज हे विसावे शुभ्र चांदण्याचे साद देती मार्ग मला तप्त या धुळीचे | पाउलांना ओढ माझ्या निळ्या आभाळाची नजरेत सामावली रेघ क्षितिजाची | घोंघावती दरीतूनी अनावर वारे तेजाळती त्या गगनी लक्ष लक्ष तारे | नभास या गवसणी गिरीशिखरांची सौदामिनी उजळती कडा काजळीची | उधाणल्या या वार्‍याची गाज मनी राही वादळी ही ओढ अशी उमलते देही | गुंजन हे गोड नको भोगी भ्रमरांचे साद द्यावी त्याने, ज्याचे पंख गरुडाचे |

भटकंती - हरिहरेश्वर (१)

लेखक मिंटी यांनी सोमवार, 24/11/2008 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या पावसाळ्यात हरिहरेश्वरला जाण्याचा योग आला होता.अगदी अचानकपणे एका शनिवारी आपण हरिहरेश्वरला जाऊया असं ठरलं.मग फटाफट सगळ्या गरजेच्या वस्तु प्रामुख्यानं कॅमेरा घेऊन आम्ही भटकंतीला निघालो. जाताना ताम्हिणी घाटातुन जायचं होतं. ताम्हिणी घाटातच पावसाळ्यातलं सौंदर्य तर अप्रतिम असतं.तसं हरिहरेश्वर पुण्यापासुन १३०कि. मी आहे. मुंबईहुन साधारण २२० कि. मी आहे हरिहरेश्वर. रेल्वेनी जायचं असल्यास कोकण रेल्वेनी माणगावला उतरुन मग एस. टी बस घेऊन पुढे हरिहरेश्वरला जाता येतं.

बालकवी

लेखक जयेश माधव यांनी सोमवार, 24/11/2008 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे बालकवि या॑च्यावीषयी काही माहीति आहे काय?