सर्किट (verified= न पडताळणी केलेला)सोमवार, 24/11/2008
त्र्यंबक बापूजी ठोमरे.
लोकमान्य टिळकांनी त्यांना बालकवी हे अभिधान दिले.
रेव्हरंड टिळकांशी त्यांचे घरोब्याचे संबंध होते.
श्रावणमासी हर्ष मानसी, आणि औदुंबर ह्या कविता त्यांनी लिहिल्या.
(का लिहिल्या, ते प्रा. बिरुटे सांगू शकतील.)
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
काही वर्षे शिक्षणक्षेत्रात काम केल्याने, चुकीची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्याची आम्हाला सवय आहे.
होय, गल्लत झाली.
-- (स्वतःचेच कान धरलेला) सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
In reply to त्यांचे नाव by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
(का लिहिल्या, ते प्रा. बिरुटे सांगू शकतील.)
बालकवी मुळातच आपल्या समकालीन जीवनातील सामाजिक व राजकीय परिस्थीतीबद्दल अत्यंत उदासीन होते. राजकीय आंदोलने, महायुद्धे या संबधीचे संदर्भ त्यांच्या कवितेत सापडत नाही (चुभुदेघे) बालकवी केशवसुतांना माननारे होते. त्यांच्या कवितेवर केशवसुतांचा प्रभाव होता. जसे, निसर्गसानिध्य, जातिरचना, सुनीत रचना, व काव्यांतर्गत काही कल्पना यामधे सारखेपणा दिसतो असे असले तरी केशवसुत ओजस्वी तर बालकवी सुकुमार, केशवसुतांची रचना ओबड-धोबड तर बालकवींची नादमधूर, केशवसूत प्रगल्भ तर बालकवी निरागस. लक्ष्मीबाई टिळकांनी स्मृतीचित्रातून म्हटले आहे की, ठोमरें बालकवी होता पण तो कवीपेक्षा बाल अधिक होता. त्यामुळे बालकवीच्या निसर्गाला जराशा मर्यादा होत्या, निरीक्षण व रुची जराशी विकलांगच होती मानवी जीवनाबद्दलचे निरीक्षणाचा अभाव दिसतो असे असले तरी सृष्टीचे सौंदर्य उकलून दाखविण्यासाठी माझा जन्म झाला आहे, अशी बालकवींची श्रद्धा होती आणि निसर्गाकडे पाहण्याचा त्यांच्या निरागस, उत्स्फुर्त,सहज अशा दृष्टीमुळे त्यांच्या कवीतेला एक अनोखा अनुभव आलेला होता, तोच अनुभव त्यांनी कवितेत मांडला म्हणून निसर्गकवी म्हणजे बालकवी असे समीकरण रुढ झाले असावे.
बालकवींच्या कविता, आठवणी, त्यांचा अपघात, अशा आठवणींचे एक पुस्तक होते नेमके आता आठवत नाही. पण ते जर मिळाले तर त्यांच्या कविता लिहिण्याचा प्रेरणा जरुर इथे लिहिन :)
बिरुटे ,
फारच उत्तम विवेचन ! जियो !
बालकवींच्या कविता, आठवणी, त्यांचा अपघात, अशा आठवणींचे एक पुस्तक होते नेमके आता आठवत नाही. पण ते जर मिळाले तर त्यांच्या कविता लिहिण्याचा प्रेरणा जरुर इथे लिहिन
हे म्हणजे सोनाळकरांचे पुस्तक का ?
हे म्हणजे सोनाळकरांचे पुस्तक का ?
नक्की सांगता येणार नाही. पण बालकवींच्या आयुष्याचे अनेक पैलू त्या पुस्तकात उलगडतात. सापडले, आठवले तर याच दुव्यात लिहीन.
-दिलीप बिरुटे
पण तो कवीपेक्षा बाल अधिक होता.
लक्ष्मीबाईंसारखे आम्हीही हल्ली, काही लोकांना, "तो डॉ पेक्षा प्रा अधिक" असे म्हणतो, त्याच्या विरुद्धच आज हा प्रतिसाद वाचून वाटले. प्रा असले तरी डॉही आहेतच, ही खात्री पटवून देणारा प्रतिसाद.
छानच लिहिले आहेत हो !
आणखी लिहा..
-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
समग्र बालकवी : संपादिका श्रीमती पार्वतीबाई ठोंमरे,( बालकवींची पत्नी) व्हीनस प्रकाशन ' तपश्चर्या'३८१ क, शनिवार पेठः पुणे २
पहिली आवृत्ती सप्टेंबर १९६६.
त्यानंतर या पुस्तकाची आवृत्ती निघाली की नाही मला माहित नाही. पण या पुस्तकात बालकवींच्या समग्र प्रकाशित अप्रकाशित अशा कविता आहेत. बालकवींचे गद्य लेखन, त्यांची पत्रे, त्यांच्याविषयी निकटवर्तीयांनी लिहिलेल्या आठवणी या पुस्तकात आहेत. सारांश बालकवींवर अधिकारवाणीने बोलता येईल इतकी माहिती या पुस्तकात नक्की आहे. :)
बालकवींचा जन्म (१८९०) गुजरातेतल्या नवसारी इथे झाला आणि वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी (१९१८) हा प्रतिभावान निसर्गकवी रेल्वे अपघातात सावनेर ह्या विदर्भातल्या गावी मृत्यूमुखी पडला.
चतुरंग
पुन्हा एकदा , तुमची गडकरी आणि बालकवी यात गल्लत नाही ना होत आहे ??
कवी आणि "राम" (बाळकराम) यातील गल्लत ! =))
इजा बिजा तिजा : त्यांचा जन्म १८५६ साली रत्नांग्रीजवळ झाला आणि मृत्यू १९२० ला मुंबईमधे झाला.
(बालकवी आणि बाल-गंगाधर यातील गल्लत !)
पलटी बसली खरी!
जन्ममृत्यूची सनावली बरोबर आहे पण गावांचे संदर्भ हुकले ते गडकरींचे आहेत. चूक निदर्शनाला आणून दिल्याबद्दल मुक्तराव धन्यवाद!
(खुद के साथ बातां : रंगा, तूही एक वर्ष अभियांत्रिकीला शिकवलेस ना? आता कळले इतकी पोरे नापास का झाली!! ;)
चतुरंग
>> पुन्हा एकदा , तुमची गडकरी आणि बालकवी यात गल्लत नाही ना होत आहे ??
बेक्कार, एकाच लेखात "डबल सिक्सर" !!!
जहबहर्या हो मुसुशेठ, काय बरोबर पकडताय एकेकाला ...
तरीच म्हटलं एवढे प्रतिसाद कसे आले लगेच ...
असो.
अवांतर : आता येवढी माहिती दिल्यावर मुसुशेठ तुम्ही स्वतःच का लिहीत नाही बालकवींवर ????
( मजेने म्हणतो आहे हां, टोमणा नाहीच, पण लिहल्यास बरेच वाटेल.)
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
=)) =))
शह आणि मात ....
मस्तच ...
स्वगत : लैच अवांतर झालं, बास आता भौ.
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
सहमत !
टवाळचिखलू यांनी दुवा दिला याबद्दल आभार.
त्या लेखातील जीएंचे मत पटले. द ग गोडश्यांनी औंदुबराची जी समिक्षा केली आहे ती वाचून जी ए जे म्हणतात तेच मला औंदुंबराच्या कवितेत जाणवले.
-- लिखाळ.
आम्हाला धडा होता त्यांचा
आणि हो गेल्याच वर्षी आम्ही त्यांच्यावर एक कर्यक्रम सादर केला होता.
त्यात मी वाचन केलेल्या ४ कवितांपैकी एका कवीतेचे हे एक कडवे सहज देतोय
पाखरा गाइले तुला कधीही ऩ कोणी
नच अश्रु धावले कोणी वनी येवोनी
निश्वास धावती सोउख्यामागे सारे
दुखाचा वाली कुणा कुणीही न बारे
-बालकवी(कवीता -पाखरास)
शब्द चुकले असण्याची शक्यता आहे.
आठवली तशी लीहीली .
फक्त माझी एक आठवण
प्रतिक्रिया
त्यांचे नाव
??
In reply to त्यांचे नाव by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
शिक्षण क्षेत्र
In reply to ?? by मुक्तसुनीत
कविता...
In reply to त्यांचे नाव by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उत्तम विवेचन !
In reply to कविता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नक्की सांगता येणार नाही
In reply to उत्तम विवेचन ! by मुक्तसुनीत
उत्तम
In reply to नक्की सांगता येणार नाही by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
व्बा वा वा !
In reply to कविता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जयेश
In reply to कविता... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समग्र बालकवी
In reply to जयेश by जयेश माधव
बिरुटेसर, व
In reply to समग्र बालकवी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आणखी काही माहिती
??
In reply to आणखी काही माहिती by चतुरंग
आज काय झाले आहे?
In reply to ?? by मुक्तसुनीत
आग्गायायाया ...
In reply to ?? by मुक्तसुनीत
बालकवींवर देण्यासाठी
In reply to आग्गायायाया ... by छोटा डॉन
खी खी खी ...
In reply to बालकवींवर देण्यासाठी by चतुरंग
आनंदी आनंद गडे
बालकवी
कौतुकास्पद.
In reply to बालकवी by टवाळचिखलू
सहमत
In reply to कौतुकास्पद. by कलंत्री
काही कविता
फुलराणी
बालकवी हे
आम्हाला
In reply to बालकवी हे by अमोल नागपूरकर
बालकवि
काय म्हणता ?
In reply to बालकवि by मन्जिरि